Nanded News : रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल; जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन

Nanded News : रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल; जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. मात्र (Nanded) नांदेडच्या हिमायतनगर येथील मराठा आंदोलकांवर रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Maharashtra News)

Nanded News
Maratha Aarkshan: जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावकऱ्यांचे अन्नत्याग; राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी

नांदेड ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर हिमायतनगर येथील मराठा समाजाने टायर जाळून आंदोलन केले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी (Maratha Aarkshan) रोखून धरला होता. परंतु नांदेड जिल्ह्यातील महामार्ग आणि इतर मुख्य मार्गावर कुठलेही आंदोलन रास्ता रोको करण्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कलम १४४ लागू करून प्रतिबंध केला आहे. याच दरम्यान आंदोलन करण्यात आले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nanded News
Dondaicha News : बंद घरात धाडसी चोरी; चार लाखांचे दागिने लंपास

२३ जणांवर गुन्हे दाखल 

जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील मराठा आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलन करत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन आंदोलकांनी केले. यामुळे रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या २३ मराठा आंदोलकांवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com