Nanded News: '२४ मृत्यूंना ट्रीपल इंजिन सरकार जबाबदार...' नांदेड जिल्हा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी विरोधकांचा संताप

24 Patients Death in Nanded Government Hospital: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अवघ्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.
Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi
Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in MarathiSAAM TV
Published On

Nanded Hospital News:

 नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अवघ्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश असून या घटनेनंतर विरोधकांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi
Nanded Civil Hospital: धक्कादायक! नांदेड शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावले; मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेडच्या (Nanded) डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयात अवघ्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. औषधांचा तुटवडा आणि वेळेत उपचान न मिळाल्याने हे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

सुप्रिया सुळेंचा संताप...

"महाराष्ट्रातील खोके सरकार फक्त ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, घर फोडा, पक्ष फोडा यांच्यात ते व्यस्त असतात. यामुळे सर्वसामान्य जनतेपासून वास्तव्यतेपासून दूर आहे. या सगळ्या चोवीस मृत्युंला हे ट्रिपल इंजिन शिंदे सरकार जबाबदार आहे.." अशा शब्दात सुप्रिया (Supriya Sule) सुळेंनी हल्लाबोल केला आहे.

अंबादास दानवेंची टीका...

नांदेड जिल्हा रुग्णालयातील या धक्कादायक प्रकारानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही संताप व्यक्त केला आहे. नांदेडमध्ये घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. ठाण्यात झालेल्या घटनेने सरकार आणि सरकारी यंत्रणा काहीही शिकलेली नाही.. अशी टीका दानवेंनी केली आहे.

तसेच "१२ नवजात मुलांचा मृत्यू का एका अर्थाने सरकारी अनास्थेचा बळी आहे. या प्रकरणाची 'तात्काळ चौकशी' वगैरे होत राहील. पण या घटनेला जबाबदार असलेल्यांवर लगोलग कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com