Nanded Civil Hospital: धक्कादायक! नांदेड शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्ण दगावले; मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश

Nanded News : शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ जणांचा मृत्यू; बारा नवजात बालकांचा समावेश
Nanded Civil Hospital
Nanded Civil HospitalSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी

नांदेड शासकीय रुग्णालय

राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांना औषधी मिळू शकत नाही. परिणामी अत्यवस्थ रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात (Nanded) नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मागील २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू (Death) झाल्याचे समोर आले आहे. (Breaking Marathi News)

Nanded Civil Hospital
Gondia News : मोटार सायकल चोरीतील २ गुन्हेगार ताब्यात; ५ मोटारसायकली जप्त

शासकीय रुग्णालयात औषधी पुरवठा करणाऱ्या हाफकीनने औषधी खरेदी बंद केली आहे. यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दरम्यान अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. 

Nanded Civil Hospital
Shahada News: शहादा दंगल.. दोन्ही गटातील १५० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे; ३५ जणांना अटक

सदरच्या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता; असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होतेय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com