Amarnath yatra Saam Tv
देश विदेश

Amarnath Yatra 2023: बाबा बर्फानीच्या भक्तांसाठी मोठी बातमी, अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली; कारणही आले समोर

Amarnath Yatra Latest News: हवामान स्वच्छ झाल्यानंतरच यात्रेकरूंना यात्रेसाठी पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.

Priya More

Jammu Kashmir News: अमरनाथ यात्रेला ( Amarnath Yatra 2023) जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. १ जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे (bad weather) काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. भाविकांना यात्रेसाठी जाण्यास थांबवण्यात आले आहे. हवामान व्यवस्थित झाल्यानंतरच भाविकांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे बालटाल आणि नुनवान येथील श्री अमरेश्वर धामची यात्रा आज थांबवण्यात आली. खराब हवामानामुळे कोणत्याही यात्रेकरूला पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हवामान स्वच्छ झाल्यानंतरच यात्रेकरूंना यात्रेसाठी पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.

गुरुवारी 17,202 भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. यात्रेच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 84,768 भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. 1 जुलै रोजी 3,400 हून अधिक यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. अमरनाथ यात्रेचा हा प्रवास 62 दिवस चालेल. अमरनाथ यात्रेबाबत सुरक्षा यंत्रणा सतर्क राहण्यासाठी लष्कराचे जवान ड्रोन, श्वानपथक आणि ठिकठिकाणी पाळत ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत.

मागच्या वर्षी 3.60 लाख भाविक दर्शनासाठी आले होते. यावेळी हा आकडा 6 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरनाथ यात्रा ही अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक 48 किमी लांबीचा नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील 14 किमी लहान पण उंच बालटाल मार्गाला जोडणाऱ्या मार्गावरील तीर्थयात्रा आहे.

अमरनाथ तीर्थयात्रा हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. दक्षिण काश्मीरमधील 3,880-मीटर-उंची पवित्र अमरनाथ गुंफा मंदिराच्या मध्यभागी आहे. अमरनाथ हे भगवान शिवाचे सर्वात पवित्र तीर्थस्थान मानले जाते. त्यामुळे देशभरातील भाविक या यात्रेमध्ये सहभागी होत बाबा बर्फानींचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT