शेतकऱ्यांना मदतीचे ट्रक पाठवले; तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेला का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Shinde vs Thackeray: मुंबईतील नेस्को सेंटरवरील दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी मदतीचे ट्रक पाठवल्याचा दावा करत, “तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेला का?” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केलाय.
Eknath Shinde questions Uddhav Thackeray over drought-hit farmer relief
Eknath Shinde questions Uddhav Thackeray over drought-hit farmer relief
Published On: 
Summary
  • मुंबईतील नेस्को सेंटरवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.

  • एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य केले

  • शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून ५ हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचे जाहीर

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून आम्ही ५००० द्यायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना तातडीची ५ हजारांची मदत मिळणारच. कुठल्या तोंडाने आरोप करता? मदतीचे ट्रक पाठवले आहेत तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेता का? असा सवाल करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

विजयादशमीच्या निमित्ताने आज शिंदे गटाचा मेळावा नेस्को सेंटरमध्ये पार पाडला. यंदाच्या मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी शेतकरी आणि दुष्काळ या विषयावर संबोधन करणार असल्याचं म्हटलं होतं. राज्यात मोठा दुष्काळ पडलाय. महायुती सरकारनं शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत देण्याचं जाहीर केलंय. त्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जातेय. विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी उद्ध ठाकरेंसह विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Eknath Shinde questions Uddhav Thackeray over drought-hit farmer relief
मोदी-शहांचं टेन्शन वाढलं! भाजपच्या माजी अध्यक्षांचा CJPला पाठिंबा; निर्दशनात आणली दिल्ली पोलिसांची चूक

पंतप्रधान आम्हाला म्हणाले, शिंदे जी चिंता मत करो, अमित शहा म्हणाले 'किसान की लिये हम चट्टान जैसे खडे है'. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्याच्या मागे उभा आहे, मात्र विरोधक याचे राजकारण करत आहेत? कुठे फेडणार हे पाप? असा सवाल शिंदेंनी केलाय. राज्यातील शेतामधील उभी पिकं करपून गेले असताना तुम्ही मुंबईत मोर्चा काढत आहात? तुम्ही असताना काय दिले हे दाखवा, असा सवालही त्यांनी केला.

Eknath Shinde questions Uddhav Thackeray over drought-hit farmer relief
Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

ही राजकारणाची वेळ नाही - शिंदे

एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा पोरगा आहे, १०० ट्रक दिवाळीचा शिधा दुष्काळी गावात रवाना झालेत, दुसरी तिसरी फेरी होईल शेतकऱ्याची दिवाळी काळी होणार नाही. आम्ही सगळ्यांना सूचना केली की, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करायची आहे. सगळ्यांना सूचना केली आहे की, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करायची आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू बघतोय. ही वेळ राजकारणाची नाही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची वेळ आहे.

धीर खचू देऊ नको असे मी शेतकऱ्यांना सांगितलं आहे. आज बाळासाहेब दिघे साहेब असते तर म्हणाले असते सण बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांचा मदतीला धावा. एकनाथ शिंदेंना शिव्या दिल्याशिवाय तुमचा एक दिवस जात नाही. आम्ही भाषण देणारे नाही रेशन देणारे आहोत.ज्या शेतकऱ्यांच्या मुला बाळांची लग्न करायचे ठरवले होते, त्यांचे लग्न पण सामूहिक पद्धतीने शिवसेना लावून देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com