Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Chandrayaan-3 To Be Launched On This DaySAAM TV

Chandrayaan 3 Launch Confirm Date : चांद्रयान प्रक्षेपणाची निश्चित तारीख आणि वेळ ठरली, या दिवशी अवकाशात झेपावणार

Chandrayaan-3 Launch date : येत्या 14 जुलै रोजी चंद्रयान 3चं चंद्रावर प्रेक्षपण होणार आहे.
Published on

Chandrayaan-3 News : : इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISROने आपल्या चंद्रयान 3 मिशनची घोषणा केली आहे.  इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या 14 जुलै रोजी चंद्रयान 3चं प्रेक्षपण होणार आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अंतराळयान उड्डाण करेल. इस्रोने यापूर्वी चंद्रायान मिशनची तारीख 13 जुलै सांगितली होती. पण ही तारीख आता बदलण्यात आली आहे. (Latest News Update)

Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Manipur Clashes: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, शाळेबाहेर महिलेची गोळ्या झाडून हत्या

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी जाहीर केले की, लॉन्च विंडो 19 जुलैपर्यंत खुली राहील. जर प्रक्षेपण नियोजित तारखेला झाले नाही तर ते 19 तारखेपर्यंत बॅकअप डेटवर हलवले जाऊ शकते. यावेळी ही मोहीम चंद्रावर सॉफ्ट-लँड करेल, असा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे.

Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Madhya Pradesh News: भाजप नेत्याची मजुरावर लघुशंका! मुख्यमंत्र्यांनी आरती ओवाळली; माफी मागत धुतले पाय... VIDEO

चंद्रयान-3 हा चंद्रयान मोहिम मालिकेतील तिसरा भाग आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याच्या भारत दुसऱ्यांदा प्रयत्न करणार आहे. आजपर्यंत केवळ तीनच देशांनी चंद्रावर अंतराळयान यशस्वीपणे उतरवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com