Stray Dogs News: चिमुकल्या मुलांचा कुत्र्यांनी घेतला चावा; संतप्त नागरिकांनी केलेल्या कृत्याने परिसरात खळबळ

Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्या मुलांचा कुत्र्यांनी घेतला चावा; संतप्त नागरिकांनी श्वानांना दिलेली शिक्षा पाहून तुमचंही काळीज हळहळेल
Stray Dogs News
Stray Dogs NewsSaam TV
Published On

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. कुत्र्यांनी लहान मुलांचा चावा घेतल्याने संतप्त नागरिकांनी टोकाची भूमीका घेतलीये. आपल्या मुलांचा चावा घेतलेल्या दोन कुत्र्यांना नागरिकांनी फास लावला आहे. या घटनेत दोन्ही कुत्र्यांचा मृत्यू झाला. (Latest Chhatrapati Sambhajinagar Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या संजय नगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन कुत्र्यांना नागरिकांनी फास देऊन ठार केले आहे. या दोन कुत्र्यांनी एकाच दिवसात पाच चिमुकल्यांचा चावा घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी हे कृत्य केलं.

Stray Dogs News
Dhule Crime News : पत्नीचा खुन करत पतीची आत्महत्या; संशयास्पद घटनेने गावात खळबळ

महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी दोन्ही कुत्र्यांबाबत महानगरपालिकेला वारंवार सूचना केल्या होत्या, तक्रारी केल्या होत्या. या परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने मोकाट कुत्रे आहेत. मात्र तरीसुद्धा महापालिकेने योग्य ती कारवाई केली नाही. असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी या कुत्र्यांना जाहीर फास दिली आहे. दरम्यान, याबाबतची तक्रारही पोलिसात देण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक नेहमीच त्रस्त होतात. अनेकदा या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांमुळे एक अपघाताची मोठी घटना घडली होती. या घटनेत दोन महिला आणि एक शाळकरी मुलगा असे तीन जण प्रवास करत होते. प्रवास करताना अचानक त्यांच्या दुचाकीमागे कुत्र्यांची एक टोळी धावत आली.

Stray Dogs News
Nanded Crime News : प्रियकराने घातली लग्नाची मागणी; मुलीच्या आईचा नकार दिल्‍याने प्रेयसीला विष पाजून केले ठार

या घटनेत दुचाकी चालक महिलेचे नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या भींतीवर दुचाकी धडकली. या अपघातात दोन्ही महिला आणि शाळकरी लहान मुलगा हवेत दूरवर फेकले गेले होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नव्हती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com