Dhule Crime News : पत्नीचा खुन करत पतीची आत्महत्या; संशयास्पद घटनेने गावात खळबळ

पत्नीचा खुन करत पतीची आत्महत्या; संशयास्पद घटनेने गावात खळबळ
Dhule Crime News
Dhule Crime NewsSaam tv
Published On

धुळे : कुंडाणे (वेल्हाणे, ता. धुळे) येथे बुधवारी (६ जून) मध्यरात्रीनंतर पतीने पत्नीचा खून करत नंतर स्वतः आत्महत्या केली. या प्रकरणी धुळे (Dhule) तालुका पोलिस ठाण्यात पतीवर गुरुवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल झाला. पतीने जबर मारहाणीतून प्रथम पत्नीचे दात पाडून, हात मोडून तिला ठार केले आणि नंतर त्याने (Police) चिठ्ठीत काही कारणे नमूद करून स्वयंपाक घरात स्लॅबच्या कडीला गळफास घेत आत्महत्या केली, अशी कुंडाणेत गंभीर चर्चा आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (Live Marathi News)

Dhule Crime News
Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली? निवडणूक आयोगाने दिल्या महत्वाच्या सूचना

घरगुती कारणासह चारित्र्याच्या संशयावरून शेतकरी पती जितेंद्र बालू सोनवणे (वय ३०) याने पत्नी प्रतीक्षा जितेंद्र सोनवणे (वय २५) हिचा खून केल्याचा (Crime News) व नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला. या दांपत्याला तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे मूळ कारण पोलिसांनी शोधावे आणि त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत संशयितांचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Dhule Crime News
Vegetables Price List Today: टोमॅटोसह महागलेल्या भाज्यांच्या दरात मोठी घसरण; सर्वसामान्यांना दिलासा

आत्‍महत्‍येपुर्वी भावाला केला होता मॅसेज

आत्महत्येपूर्वी जितेंद्रने मुंबईतील भाऊ गणेश यास मुलांचा सांभाळ कर, असा मोबाईवर मेसेज पाठविला. तो गणेशने पहाटे पाचनंतर पाहिला. त्याने संपर्कानंतर जितेंद्रच्या मुलीने घडलेली घटना सांगितली. जितेंद्रचे आई- वडील बदलापूर येथे मोठ्या मुलाकडे गेले होते. मृत जितेंद्रने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, काही व्हिडिओ क्लिप, मेसेज संशयास्पद असून, त्याची चौकशी करून या दांपत्याच्या आत्महत्या किंवा टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केलेल्या संशयितांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशीही मागणी आहे.

Dhule Crime News
ZP School In Cattle Shed: चक्क गुरांच्या गोठ्यात भरते जिल्हा परिषदेची शाळा; पाऊस पडला की शाळा बंद

दरम्यान, कुंडाणेत जितेंद्रचे घर सकाळी साडेसहा ते सातपर्यंत बंद असल्यामुळे शेजारच्यांनी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसपाटलांना माहिती दिली. त्यांच्यासह ग्रामस्थांनी दरवाजा तोडून घरात पाहिले असता सोनवणे दांपत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विजया पवार, हवालदार सुनील जोहरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनवणे दांपत्याचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कैलास श्यामराव पाटील (चिमणपुरी, पिंपळे बुद्रुक, अमळनेर) यांच्या फिर्यादीनुसार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com