Local Bodies Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली? निवडणूक आयोगाने दिल्या महत्वाच्या सूचना

Local Bodies Election In September and October: निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी लगबग सुरू केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

Pune News: अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. राज्यात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी लगबग सुरू केली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक भावी उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची वाट पाहत आहेत. अशातच या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics News: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; विधानपरिषदेतील बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार!

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने एका राजपत्रामध्ये निवडणुकीचा उल्लेख केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: आगामी निवडणुका भाजप-शिंदे गट आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार? मुख्यमंत्रीपद कुणाकडे? वाचा...

ओबीसी आरक्षाशिवाय निवडणुका?

राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल मोठे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा निकाल रखडला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ओबीसी आरक्षणाचा अद्याप प्रलंबित निकाल लागला नाही, तर राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई-पुण्याह राज्यातील ११ महापालिकांची मुदत गेल्या वर्षी १५ मार्च रोजी संपली आहे. तर महापालिकेची मुदत संपून दोन वर्षांचा काळ लोटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com