Lalu Prasad Yadav on Ajit Pawar: शरद पवारांच्या वयावर अजित पवारांनी केलं वक्तव्य, लालू प्रसाद यादव म्हणाले...

शरद पवारांच्या वयावर अजित पवारांनी केलं वक्तव्य, लालू प्रसाद यादव म्हणाले...
Lalu Prasad Yadav on Ajit Pawar
Lalu Prasad Yadav on Ajit PawarSaam Tv
Published On

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पक्षात निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटाकडून अधीकृत पक्ष हा आपल्याकडेच असल्याचा दावा करण्यात येत आहे.

यातच बुधवारी दोन्ही गटांकडून सभा झाली. यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावर भाष्य करत, कुठे तरी आता त्यांनी थांबलं पाहिजे, असं म्हटलं होतं. यावरच आता बिहारमधील आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Lalu Prasad Yadav on Ajit Pawar
Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting: शरद पवारांना बैठक बोलवण्याचा अधिकार नाही, अजित पवार गटाचा मोठा दावा

लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत की, “एखाद्याने असे म्हटले म्हणून तो निवृत्त होईल का? कोणी म्हातारा झाला म्हणून राजकारणातून निवृत्त होतो का? राजकारणात निवृत्तीचे वय नसते. आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत. यामुळे विरोधी एकजुटीला धक्का लागणार नाही.''

लालू म्हणाले, ''१७ पक्षांचे लोक एकत्र येत आहेत. भाजपच्या लोकांना जे म्हणायचे आहे, ते बोलू द्या. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होणार आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, पण हा सगळं षड्यंत्र त्यांच्या पुतण्याचे आहे.''

Lalu Prasad Yadav on Ajit Pawar
Family Controversy In Politics: सत्तेच्या महासंग्रामाचा फॅमिली ड्रामा; राजकारणामुळे देशातल्या 'या' कुटूंबात पडलीय उभी फूट

तत्पूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांना फोन करून पाठिंबा दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com