Family Controversy In Politics: सत्तेच्या महासंग्रामाचा फॅमिली ड्रामा; राजकारणामुळे देशातल्या 'या' कुटूंबात पडलीय उभी फूट

Families In Politics: राज्याच्या राजकारणाची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. फक्त पवार कुटूंबच नाही तर देशात याआधीही सत्ता नाट्यामुळे अनेक घराण्यांमध्ये फूट पडली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaamtv
Published On

Family Political Crisis In India: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही, तर आमच्याकडे सर्वाधिक आमदारांचं बळ असून राष्ट्रवादी पक्ष (NCP) आमचाच आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीतसह पवार कुटूंबामध्येही मोठी फूट पडली.

देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पवार कुटूंबामध्येही फूट पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान, सत्तेच्या वादातून कुटूंबामध्ये फूट पडण्याची ही पहिली वेळ नाही. या आधीही देशात अनेक घराण्यांमध्ये परिवारवाद जाहीरपणे दिसून आला आहे.

Maharashtra Politics
Todays NCP Meeting: शरद पवार की अजित पवार? राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? आज होणार फैसला!

१. चिराग पासवान- पशुपती पासवान...

बिहारमधील लोक जनशक्ती पक्षावर (एलजेपी) दाव्याचा लढा जून 2021 मध्ये समोर आला. तत्कालीन केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांच्या निधनानंतर एका वर्षाच्या आत कुटुंबात पक्षावर दावा करण्यासाठी वाद सुरू झाला. खरे तर रामविलास जेव्हा केंद्रात राजकारण करायचे तेव्हा बिहारचे राजकीय निर्णय पशुपती पारस घेत असत.

आपल्या भावाच्या मृत्यूनंतर पशुपती कुमार पारस सक्रिय झाले आणि त्यांनी सहा पैकी पाच खासदारांना आपल्या गटात नेले आणि पुतणे चिराग पासवान यांना पदच्युत केले. पशुपती यांनी पक्षाबरोबरच संसदीय पक्षनेतेपदही काबीज केले आहे. मात्र, रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग याने काकांसमोर संघर्षाचा गजर केला आहे. सध्या या मोदी सरकारमध्ये पशुपती कुमार पारस मंत्री आहेत. आता चिराग यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Political Storm Part 2 : महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा पार्ट लवकरच; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?

२. अखिलेश यादव- पशुपाल यादव..

2016 मध्ये समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव (MulayamSigh Yadav) यांचा राजकीय वारसा नियंत्रित करण्यासाठी काका शिवपाल यादव आणि पुतणे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यात युद्ध सुरू झाले. वास्तविक, सपाची कमान मुलायमसिंह यादव यांच्या हाती असेपर्यंत शिवपाल यादव हे पक्षाचे सर्वेसर्वा होते. संघटनेपासून ते सरकारपर्यंतचे सर्व निर्णय ते घेत असत. अशा स्थितीत शिवपाल हे स्वत:ला मुलायम यांचे उत्तराधिकारी मानत होते.

परंतु मुलायम यांनी आपला राजकीय वारसा भावाकडे देण्याऐवजी 2012 साली मुलगा अखिलेश यादव यांच्याकडे सोपवला. ज्यानंतर शिवपाल यांनी 2017 च्या निवडणुकीपूर्वी पुतणे अखिलेश यादव यांच्या विरोधात बंड केले. काका-पुतण्याचे भांडण घरातून रस्त्यावर आले. 30 डिसेंबर 2016 रोजी अशी परिस्थितीही निर्माण झाली की तत्कालीन अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी मुलगा अखिलेश यादव आणि चुलत भाऊ रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Maharashtra Politics
Pune News : नामांकित शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात सीसीटीव्ही कॅमेरे, बंजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी मुख्याध्यापकास चाेपला

३. पंजाबचा बांदल परिवार...

पंजाबचे तगडे नेते दिवंगत प्रकाशसिंग बादल (PrakashSIngh Bandal) यांच्या कुटुंबातील वादही चांगलाच गाजत आङे. शिरोमणी अकाली दलातही फूट पडली. पक्षाचे संरक्षक प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे मनप्रीत सिंग बादल यांनी बंडखोरी केली.

प्रकाश सिंग यांच्यावर नाराज होऊन मनप्रीतने वेगळे होऊन पीपल्स पार्टी ऑफ पंजाब हा स्वतःचा पक्ष स्थापन केला. वास्तविक, प्रकाश यांच्याकडून पुतण्या मनप्रीतच्या बंडखोरीचे कारणही सत्तेची महत्त्वाकांक्षा होती. मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याचा प्रश्न इतका मोठा झाला की काका-पुतण्याचं नातं वादात सापडले.

Maharashtra Politics
Manipur Clashes: मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना, शाळेबाहेर महिलेची गोळ्या झाडून हत्या

४. राज ठाकरे- उद्धव ठाकरे...

हिंदूत्व आणि मराठी माणसाचे राजकारण करणारा पक्ष अशी शिवसेनेची (Shivsena) प्रतिमा आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांची राजकीय शैली पक्षाच्या राजकारणाला साजेशी होती. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या राजकीय शैलीची झलक शिवसैनिकांना दिसायची आणि ते त्यांना राजकीय वारशाचे वारसदार मानू लागले, पण तसे झाले नाही.

बाळासाहेबांनी पक्षाची कमान उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्याकडे सोपवली. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची कमान आल्यावर काही नेते राज ठाकरेंना त्यांच्या राजकीय वाटेतील काटा म्हणून पाहू लागले. उद्धवकाळातील शिवसेनेत राज ठाकरेंना बाजूला केले जाऊ लागले. यामागे राज ठाकरे यांची पक्षातील लोकप्रियता हे कारण असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Maharashtra Politics
Delhi News : रात्रीच्या वेळी पतीच्या भलत्याच मागण्यांनी कंटाळली पत्नी, थेट पोलिसांत जात केली तक्रार

५. तेजप्रताप यादव- तेजस्वी यादव...

बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) पक्षप्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यातही मतभेद निर्माण झाले होते. 2021 मध्ये लालूंचे दोन पुत्र तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात जगदानंद सिंह यांच्या बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीवरून वाद झाला होता. दोन्ही भावांनी एकमेकांविरोधात वक्तव्ये करून वातावरण तापवले होते.

खरे तर जगदानंद सिंह यांनी राजदच्या विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आकाश यादव यांना हटवले होते. तर आकाशची नियुक्ती तेज प्रताप यांनी केली होती. त्याचवेळी तेजस्वीने आकाशच्या जागी गगन यादव यांना विद्यार्थी संघटनेचे नवे प्रदेशाध्यक्ष बनवले होते. त्यामुळे दोन भावांमध्ये वाद वाढून घरात मतभेद वाढले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com