Maharashtra Political Storm Part 2 : महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचा दुसरा पार्ट लवकरच; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
Congress will also split News Update : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीतील फुटीच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा मोठा भूकंप झाल्यानंतर आणखी एक भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट यांनी याबाबत खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेसमध्ये आता मोठी फूट पडणार असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ जुलै रोजी अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्यातील भाजप आणि शिवसेना सरकारला पाठिंबा दिला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आपल्याला ४० आमदारांचं समर्थन असल्याचा दावाही त्यांनी केला. अजित पवार यांच्या गटाने घेतलेल्या सभेत त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.
अजित पवार यांच्या सरकारमधील सहभागाने शिंदे गटात प्रचंड नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, कुणीही नाराज नाही, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महाविकास आघाडीतील तिसरा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचा दावा केला जात आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, 'काँग्रेसचे अनेक आमदारांना पक्ष सोडायचा आहे. १६ ते १७ आमदारांची काँग्रेस पक्ष सोडण्याची इच्छा असल्याचे कानावर आले आहे. त्यांच्यात एकमत होतेय का याची वाट बघितली जात आहे. ते लवकरच याबाबतीत निर्णय घेतील आणि काँग्रेसमध्ये फूट पडेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.