Raj-Uddhav Thackeray Alliance: ठाकरे बंधू एकत्र येण्याची किती शक्यता? आधीच्या प्रयत्नांत नेमकं काय झालं?

Maharashtra Politics: आज मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या भेटीने युतीच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.
Raj-Uddhav Thackrey Alliance
Raj-Uddhav Thackrey Alliancesaam tv
Published On

>>निवृत्ती बाबर, साम टीव्ही

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. आधी मुंबई, ठाणे आणि पुण्यात या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं यासाठी पोस्टर्स झळकले होते. त्यानतंर आज मनसेचे नेते अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या भेटीने या चर्चांना दुजोरा मिळाला आहे.

या दोन्ही नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीनंतर अभिजीत पानसे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली, तर संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. परंतु राज ठाकरेंच्या भेटीनंतर अभिजीत पानसे यांनी युतीचा कोणताही प्रस्ताव नाही आम्ही सहज भेटलो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यापूर्वी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यांना सर्वांना अपयश आले. आता अभिजीत पानसे आणि संजय राऊत यांच्या प्रयत्नांना यश मिळणार का हे पाहावं लागणार आहे. यापूर्वी तीन वेळी प्रयत्न झाले ते कोणी केले आणि त्याचं पुढे काय झालं जाणून घेऊया.

Raj-Uddhav Thackrey Alliance
Ajit Pawar News In Marathi: महाराष्ट्राच्या राजकारणात महिनाभरात नेमकं काय घडणार? माजी मुख्यमंत्र्यांनी सगळं काही सांगितलं

पहिला प्रयत्न शिवसैनिक सतीश वळंजू यांनी केला

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत यासाठी सामान्य नागरिक म्हणून शिवसैनिक सतीश वळंजू यांनी प्रयत्न केले होते. वळंजू हे मातोश्रीवर पेस्ट कंट्रोलच काम करायचे, ते व्यावसायिक आहेत. त्यांनी दोन्ही भाऊ एकत्र यावेत म्हणून मोहीम सुरु केली होती. या मोहिमेची सुरुवात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली होती. त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांना निवेदन देऊन एकत्र येण्याचे आवाहन केले होते. परंतु त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.

दुसरा प्रयत्न बाळा नांदगावकर यांचा

नसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील अनेक वेळा दोन्ही नेते एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले आहेत. बाळा नांदगावकर 2017 साली मनसेचे दूत म्हणून मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. महापालिका निवडणुकीआधी नांदगावकर हा युतीचा प्रस्ताव घेऊन मतोश्रीवर गेले. परंतु त्यांची भेट घेणं उद्धव ठाकरे यांनी टाळलं होतं. शिवसेनेचे नेते अनिल देसाई, सुभाष देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीवरच नांदगावकर यांना समाधान मानावं लागलं होतं. शिवसेनेचे हे प्रमुख नेते आणि नांदगावकर यांच्यातच याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती.

मनसेकडून आलेला प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादर केला जाईल. त्यांचे मत जाणून घेऊन अधिक माहिती नंतर कळवली जाईल असा निरोप नांदगावकर यांना देण्यात आला. परंतु त्यावर पुढे चर्चाच झालीच नाही. केवळ दोन्ही पक्ष एकत्र येणार अशा चर्चाच सुरु होत्या. दरम्यान बाळा नांदगावकर यांनी आता दोन्ही भाऊ एकत्र येतील का नाही याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिली होती. (Breaking News)

Raj-Uddhav Thackrey Alliance
Maharashtra Politics: पालकमंत्रिपदावरून वादाची पहिली ठिणगी; अजित पवार गट विरूद्ध शिवसेना 'सामना' रंगण्याची शक्यता

तिसरा प्रयत्न संदीप देशपांडे यांचा

असाच एक प्रयत्न मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी दोन्ही पक्षाची युती व्हावी म्हणून प्रयत्न केले होते. संदीप देशपांडे यांनी केलेल्या युतीच्या प्रयत्नांनाही यश आलं नाही. दरम्यान मनसेकडून अनेकवेळा युतीसाठी प्रयत्न करण्यात आले, पण त्याला ठाकरेंकडून वारंवार अल्प प्रतिसाद मिळाला असं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे. (Latest Political News)

परंतु आता राज्यातील राजकीय परिस्थीत पूर्णपणे बदलली आहे. राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. त्यामुळे आता राजकीय समीकरणं देखील बदलली आहे. शिवाय मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत ठाकरे बंधु एकत्र येतात का हे पाहावं लागणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com