Actress Death : आलियासोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं अचानक निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Divya Vinekar Death : आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटात महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिव्या विणेकर यांचे अचानक निधन झाले. आरजे रोहिणी यांनी भावुक पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला.
Divya Vinekar Death
Divya Vinekar Death
Published On: 

Actor Divya Vinekar passes away : अभिनेत्री आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या गाजलेल्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटात महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या विणेकर हिचं अचानक निधन झालं आहे. तिच्या या अकस्मिक जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिव्याच्या निधनाची बातमी तिची मैत्रीण आणि प्रसिद्ध आरजे रोहिणीने सोशल मीडियावर शेअर केली. तिच्या जाण्यावर चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटात अभिनेत्री दिव्या विनेकर महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. याशिवाय, दिव्याने २०२२ मध्येच विद्या बालन आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जलसा’ या थ्रिलर चित्रपटातही काम केले होते.

आरजे रोहिणी रामनाथन यांनी इंस्टाग्रामवर एका भावनिक पोस्ट केली. त्यांनी दिव्या विनेकर यांचे निधन अचानक आणि अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण आणि निधनाबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Divya Vinekar Death
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात सोन्याचे भाव घसरले; दुकानांमध्ये उसळली तुफान गर्दी
Divya Vinekar Death
Ladki Bahin Yojana: दिवाळीत होणार डबल धमाका? लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० जमा होणार?

दिव्या यांच्या या आकस्मिक निधनाने मित्र आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आरजे रोहिणीने दिव्या यांच्या मनमिळाऊ स्वभावाची, कामाप्रती असलेल्या व्यावसायिक दृष्टिकोनाची आणि त्यांनी सभोवतालच्या लोकांवर सोडलेल्या प्रभावाची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली. आरजे रोहिणी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आपली लाडकी डीव्ही (दिव्या विनेकर) आता आपल्यात नाही, हे अत्यंत दुःख आणि धक्क्याने मी तुम्हा सर्वांना कळवत आहे. हे खूप अचानक आणि अनपेक्षित होते. तिचे कुटुंब आणि तिच्या स्नेह व प्रेमाने ज्यांच्या आयुष्याला स्पर्श केला, ते सर्वजण या क्षणी तीव्र दुःखातून जात आहेत. कृपया त्यांना सध्या कोणतेही प्रश्न विचारू नका.

Divya Vinekar Death
लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! 'या' नव्या मार्गावर धावणार दररोज ५० लोकल; प्रवासाचा वेळ अर्धा होणार?

अभिनयात येण्यापूर्वी काय करत होत्या दिव्या?

अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी दिव्या विनेकर यांनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम केले होते. डिजिटल मार्केटिंगमध्ये जवळपास एक दशक काम केल्यानंतर, त्यांनी २०१८ मध्ये मुख्य प्रवाहातील कला क्षेत्रात प्रवेश केला. अभिनयाव्यतिरिक्त त्या एक डिजिटल कंटेंट क्रिएटर, स्वतंत्र कंटेंट लेखिका आणि कवयित्री देखील होत्या.

अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी दिव्या विनेकर यांनी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम केले होते. डिजिटल मार्केटिंगमध्ये जवळपास एक दशक काम केल्यानंतर, त्यांनी २०१८ मध्ये मुख्य प्रवाहातील कला क्षेत्रात प्रवेश केला. अभिनयाव्यतिरिक्त त्या एक डिजिटल कंटेंट क्रिएटर, स्वतंत्र कंटेंट लेखिका आणि कवयित्री देखील होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com