सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात सोन्याचे भाव घसरले; दुकानांमध्ये उसळली तुफान गर्दी

Pune Gold Rate : दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात सोने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रांका ज्वेलर्सचे मालक फत्तेचंद रांका यांच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४६ हजार रुपयांवरून घसरून १ लाख ४५ हजार ३०० रुपये झाला आहे.
Gold Price Today
Gold Price Todaygoogle
Published On: 

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीला सोने-चांदी, विविध वस्तू तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाती. यंदा राज्यात दुष्काळ असला तरी, आज विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध सोने-चांदीच्या दुकानांमध्ये नागरिकांकडून सोने खरेदी केली जात आहे. विजयादशमीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यामुळे आज शहरात सोने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पुण्यातील 'रांका ज्वेलर्स' येथे आज सकाळपासून नागरिकांकडून सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत बोलताना रांका ज्वेलर्सचे मालक तथा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले की, "साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. आज सोने खरेदी करून आणणे म्हणजे घरात लक्ष्मी आणण्यासारखे मानले जाते.

Gold Price Today
Mumbai : नवरात्रीच्या गरब्यात भंयकर घडलं! दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

नागरिकांकडून सोन्याच्या भाववाढीचा कोणताही विचार न करता आज सोने खरेदी केले जात आहे. काल २४ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ४६ हजार रुपये होते, ते आज कमी होऊन १ लाख ४५ हजार ३०० रुपये झाले आहेत. आज सोन्याचे दर ७०० रुपयांनी कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असून, हे दर येत्या दिवाळीपर्यंत असेच राहण्याची शक्यता आहे. आज सोन्याच्या खरेदीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे."

Gold Price Today
Manoj Jarange : पायाखालची माती सरकेल! भाजपला ५०० कोटींचं खोटं सांगितलं? जरांगेंचा थेट एकनाथ शिंदे अन् श्रीकांत शिंदेंना इशारा

ते पुढे म्हणाले की, "यंदा राज्यात दुष्काळ असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी, आज दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुष्काळाचा परिणाम आज जरी जाणवत नसला, तरी दिवाळीमध्ये तो नक्कीच जाणवेल. तसेच, येत्या दिवाळीत त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. आपले सर्वांचे कर्तव्य आहे की, शेतकऱ्यांना जेवढी जास्त मदत करता येईल, तेवढी केली पाहिजे. ज्याप्रमाणे राजस्थानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तेथील लोकांनी परिस्थितीनुसार बदल करत जीवन जगण्यास सुरुवात केली आहे, त्याचप्रमाणे आपल्या इथेही बदल केले गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत," असेही रांका यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com