Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: बापरे बाप! बैलाने चिमुकल्याला थेट शिंगाने उचलून फेकलं अन्... काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल...

काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Gangappa Pujari

Aligarh: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका कुत्र्याने लहान मुलाचा चाव घेत लचके तोडल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भटक्या प्राण्यांचा आणि कुत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तसेच त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणीही झाली होती.

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर सध्या सोशल मीडियावर असाच थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे,या व्हायरल व्हिडिओमध्ये बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचलून फेकल्याचे दिसत आहे. (Latest Marathi News Update)

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा अलिगडमधील असल्याचे समोर आले आहे. व्हिडिओमध्ये भटक्या बैलाने लहान मुलाला चिरडल्याचे पाहायला मिळत आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ( Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलगा रस्त्यावर उभा असल्याचं दिसत आहे. तो आपल्याच नादात घराबाहेर खेळत असल्याचे दिसत आहे. मुलगा रस्त्यावर एकटाच उभा असताना अचानक भटका बैल तिथे येतो. बैल आपल्यावर हल्ला करेल याची चिमुरड्याला काहीच कल्पना असते. काही सेकंदात बैल मुलाला अक्षरश: हवेत उडवतो. त्यानंतर बैलथेट त्या मुलाच्या अंगावर जाऊन बसतो.

मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक व्यक्ती घरातून धावत येते. आणि बैलाला हाकलून लावत मुलाला उचलून घेते. या हल्ल्यात मुलाला नेमकी कुठे जखम झाली हे दिसत नसले तरी तो गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अशा भटक्या कुत्र्यांची आणि प्राण्यांची योग्य ती सोय करण्याची मागणी केली आहे. तर अनेकांनी मुलाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lost Wedding Ring: 83 वर्षांपूर्वी हरवलेली लग्नाची अंगठी सापडली; थेट कुटुंबीयांच्या हातात दिली, नेमकं काय घडलं?

Healthy Lifestyle : शौचास बसताना तुम्हीही करता का 'ही' चूक? आजच सुधारा नाहीतर आयुष्यात येईल भयानक संकट

Rinku Rajguru: जांभळ्या साडीत रिंकू राजगुरुचा शाही थाट! मराठमोळ्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Mobile Photography : कॅमेरा असो वा नसो, 'या' सोप्या ट्रिक्सने मोबाईलच्या क्लिकवर काढा स्टायलिश आणि क्लिअर फोटो

Maharashtra News Live Update: दिवाळीच्या निमित्ताने कांदिवली पोलिसांना मोठे यश

SCROLL FOR NEXT