
Maharashtra Assembly Budget Session: राज्यात आज हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दूरदृष्टीचा अभाव आणि वास्तवाचा भान नसलेला असा हा अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले. स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प अशा शब्दात त्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली.
शेतकऱ्यांच्या शेतपंपाच्या वीजमाफीची घोषणा त्यांनीच केली होती, आम्ही सरकारमध्ये असताना त्यांनी वीजबील माफाची मागणी केली होती, परंतु आता त्याचा साधा उल्लेखही केला नाही नाही. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना 6000 रुपये जाहीर केले आहेत.
म्हणजे कुटुंब पाच सदस्य असलेल्या शेतकऱ्या 3 रुपये रोज मिळणार आहे. तीन रुपयांत चहा तरी मिळतो का? ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे पवार म्हणाले. हे करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पिकाला दर द्या अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. (Latest Marathi News)
महिला दिनानिमित्ताने काही घोषणा सरकार करेल असे आम्हाला वाटलं होतं. पण तेही नाही. मराठवाडामुक्ती संग्रामाच्या अमृत मोहत्त्वानिमित्त भरीवर तरतूद करणार असे म्हणाले म्हणजे नेमकं काय? काहीतरी आकडेवारी द्यायला हवी होती.
एकंदरीतच राज्याची परिस्थिती पाहिल्यानंतर राज्य कर्जबाजारी होण्याकडे वाटचाल झाली आहे. साडेसहा लाख कोटीच्या पुढे कर्ज गेले आहे. याबाबत काही ठोसपणे बोलायला अर्थमंत्री तयार नाहीत, असेही अजित पवार म्हणाले. (Latest Political News)
तसेच 14 मार्चला सुप्रीम कोर्टातील निकाल विरोधात जाणार असे वाटत असेल किंवा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात बसलेला झटका आणि कसब्यात बसलेला झटका यामुळे त्यांना जनता आपल्यासोबत नाही असे वाटत असेल किंवा खेडमधील न भुतो ना भविष्यती अशी झालेली सभा आणि वरळीत रिकाम्या खुर्च्या दिसल्यामुळे या घोषणा करण्यात आल्या असाव्या असा टोला अजित पवारांनी केली.
त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा अशाप्रकारे घडायला लागल्यामुळे आता काय होतं नव्हतं ते जाहीर करून टाका, पुढचं पुढं बघू या हेतूने मांडलेला दूरदृष्टीचा अभाव असलेला आणि वास्तवाचं भान नसलेला हा अर्थसंकल्प आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे लबाडाघरचं जेवण, जेवल्याशिवाय काही खरं नाही असा टोला अजित पवारांनी सरकारला लगावला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.