CM Eknath Shinde: 'सर्वांचा करेक्ट कार्यक्रम केला...' अर्थसंकल्पावर CM शिंदेंची प्रतिक्रिया; उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला

CM Eknath Shinde On Maharashtra Budget: आम्ही गाजर हलवा तरी दिला, त्यांनी काहीच दिले नाही, सर्व स्वत:च खाल्ले," अशी खरमरीत टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Tv

Maharashtra Budget Session 2023: आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत ध्येय सादर करीत अर्थ संकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी "हे गाजर हलवा दाखवणारे बजेट आहे," या उद्धव ठाकरेंच्या टिकेलाही उत्तर दिले आहे.

CM Eknath Shinde
Udayanraje Bhosale : त्यावेळेस तुमचंही लाेक पेंटिंग काढतील : उदयनराजे भाेसले

काय म्हणाले एकनाथ शिंदे....

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना "हा सर्वसमावेशक आणि राज्यासाठी हितकारी असलेले ऐतिहासिक बजेट," असल्याचे म्हणले आहे. तसेच "यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील, त्याचबरोबर लेक लाडकी योजनेमुळं महिलांचा विकास होईल," असा विश्वास व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला दिले उत्तर...

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) यांनी हे गाजर हलवा बजेट असल्याची टीका केली होती, या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "आम्ही गाजर हलवा तरी दिला, त्यांनी काहीच दिले नाही, सर्व स्वत:च खाल्ले," अशी खरमरीत टीका केली आहे.

CM Eknath Shinde
Ajit Pawar On Budget: लबाडाघरचं आवताण, जेवल्याशिवाय खरं नाही; विरोधी पक्षनेते अजित पवारांचा सरकारला खोचक टोला

सर्वांचा करेक्ट कार्यक्रम केला..

याबद्दल पुढे बोलताना "या बजेटवर विरोधकांकडे बोलायला काहीच शिल्लक राहिले नसून त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते," असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी सर्वांचा करेक्ट कार्यक्रम केला, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com