Air India Express x
देश विदेश

Air India Expressच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड, टेकऑफ होण्याआधी उड्डाण रोखलं; प्रवाशांमध्ये मोठी खळबळ

Air India एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली. तांत्रिक अडचणींमुळे हे विमान ऐन टेकऑफच्या आधी धावपट्टीवर थांबवण्यात आले. बराच वेळ विमान धावपट्टीवर असल्याने विमानातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Yash Shirke

Air India Plane Crash : १२ जून रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तब्बल २७५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. यात विमानातील पायलट आणि कू मेंबर्सचा देखील समावेश आहे. एअर इंडियाच्या विमानाने अहमदाबाद विमानतळावरुन उड्डाण केले. अवघ्या काही सेकंदात विमान खाली कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे देशात मोठी खळबळ उडाली असताना एअर इंडिया एक्सप्रेसच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील हिंडन विमानतळावरून कोलकात्याच्या दिशेने निघणाऱ्या I5-4151 या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे तास-दीड तास विमान धावपट्टीवर थांबले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित वेळेनुसार उड्डाणासाठी सज्ज असलेले हे विमान शेवटच्या क्षणी थांबवण्यात आले. विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात आल्यानतर कर्मचाऱ्यांनी विमानाचे उड्डाण थांबवले. त्यानंतर विमानतळावरील अभियंत्यांना तातडीने पाचारण करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. तांत्रिक बिघाडाचे नेमके स्वरुप अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

या विलंबाबाबत एअर इंडिया एक्स्प्रेसकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. 'हिंडन-कोलकाता विमानाच्या यंत्रणेत तांत्रिक अडचण आढळल्याने विमानाचे उड्डाण लांबणीवर टाकावे लागले. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तांत्रिक तपासणीनंतर आणि अभियंत्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विमान उड्डाणासाठी रवाना करण्यात आले', असे निवेदनामध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT