गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला मोठा हादरा बसला. या विमान अपघातामध्ये आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या विमान अपघाताचा तपास सध्या सुरू असून तपासात एक मोठे यश मिळाले आहे. तपासकर्त्यांना कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजे सीव्हीआर सापडला आहे. यापूर्वी फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजे एफडीआर देखील सापडला होता.
अहमदाबादवरून लंडनाला निघालेल्या विमानाला गुरूवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास अपघात झालं. उड्डाण घेतलेले हे विमान काही सेकंदात कोसळलं. या अपघातामध्ये विमानामधील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक प्रवासी बचावला. या प्रवाशाने अपघात होताना एमर्जन्सी डोअरमधून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले. तर हे विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणावरील ३४ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची चौकशी करणाऱ्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने यापूर्वी फक्त फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडल्याची पुष्टी केली होती. पण आता कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरही सापडला आहे. अधिकारी पीके मिश्रा यांनी सांगितले की, दोन्ही ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहेत. ते शोधल्याने अपघाताचे कारण शोधणे सोपे होईल. एएआयबीने तपास सुरू केला आहे. तर यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड देखील स्वतंत्र तपास करत आहे कारण विमान अमेरिकेत बनवले गेले होते.
पीके मिश्रा यांनी सर्किट हाऊस येथे एक उच्चस्तरीय बैठकही बोलावली होती. या बैठकीला केंद्र आणि राज्य सरकार, एएआयबी आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मदत, बचाव आणि तपास कार्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पी के मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, 'या अपघाताने मला खूप दुःख झाले. प्रत्येकजण दुःखी आहे. पीडितांच्या दु:खात सहभागी होणे हे आपले कर्तव्य आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.