
अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणी लंडनला कामासाठी चालले होते, कुणी आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते, तर कुणी भारतामध्ये आपल्या नातेवाईकांना भेटून परत लंडनला जात असताना हा भयानक अपघात झाला. या अपघातामध्ये अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. या विमान अपघातामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. त्या भारतामध्ये आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आल्या होत्या.
एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश होता. धीर आणि हीर बक्षी असं या दोन्ही बहिणींची नावं होती. या दोघीही त्यांच्या आजीचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून भारतात आल्या होत्या. दोघीही २० वर्षांच्या होत्या. आजीचा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्या अहमदाबादमध्ये राहिल्या देखील. त्यानंतर त्या १२ जूनला परत लंडनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. पण लंडनला जाण्यापूर्वीच त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला.
धीर आणि हीर अहमदाबादवरून लंडनमधील गॅटविकला परत जात होते. पण ते ज्या एअर इंडियाच्या विमानाने जात होते ते विमान उड्डाणानंतर अवघ्या ६० सेकंदांत कोसळले. दोन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यामुळे बक्षी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धीर आणि हिरच्या आजीला देखील मोठा धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघींचा आजीसोबतचा क्युट स्माईल देतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
धीरने फॅशन डिझाइनमध्ये पदवी घेतली होती आणि ती डिझायनर होती. तर हीर गुंतवणूक आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात प्रोजेक्ट लीडर म्हणून काम करत होती. तिने यापूर्वी सिंगापूरमध्ये काम केले होते. सिंगापूरमध्ये दोघींचे बालपण गेले होते. सध्या त्या लंडनमध्ये राहत होत्या. धीर आणि हीरचे आजीवर खूप प्रेम होते. या प्रेमाखातर त्या आजीला सरप्राईज देण्यासाठी तिच्या ७५ व्या वाढदिवशी आल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.