Ahmedabad Plane Crash: मुलीला सरप्राईज द्यायला लंडनला निघाले, विमान अपघातात आई-वडिलांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी दुर्दैवी कहाणी

Air India Plane Crash: धवनी पटेलच्या दीक्षांत समारंभासाठी सरप्राइज देण्यासाठी लंडनला निघालेले तिचे आई-वडील अहमदाबाद विमान अपघातात ठार झाले. हे दुःख तिच्या आयुष्यात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करणारं ठरलं.
Air India Plane Crash
Scene of the Ahmedabad crash where Dhvani Patel’s parents lost their lives while en route to surprise her for graduation in London.Saam
Published On

मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी नवरा बायको तिला सरप्राईज देण्यासाठी लंडनला जाणार होते. पण लंडनला पोहोचण्याआधीच त्यांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये शिकणारी मुलगी आपल्या आई वडिलांना पुन्हा कधीच भेटू शकणार नाही. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आतंरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात एअर इंडियाचं विमान कोसळलं. या विमानात अनेक प्रवासी प्रवास करीत होते. या अपघातात धनवी हिचे आई वडीलही दगावले.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, धवनीचे आई वडील, रजनीकांत पटेल आणि दिव्याबेन पटेल आणि तिची मावशी हेमांगी बेन यांच्यासोबत गुजरातमधील वासद येथून लंडनला विमानाने जात होते. ते आधी १७ जून रोजी प्रवास करणार होते. परंतु, तिला सरप्राईज देण्यासाठी त्यांनी प्लॅन बदलला. त्यांनी १२ जूनला लंडनला जाण्याचे ठरवले.

Air India Plane Crash
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी बड्या खासदाराला वेगळीच शंका; एकाचवेळी दोन्ही इंजिन बंद पडली कशी?

धवनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या पालकांना तिनं दीक्षांत समारंभासाठी बोलावून घेतलं. लंडनला जाण्यासाठी धवनीच्या पालकांनी १२ तारीख निवडली. पण १२ तारीख अपशकुनी ठरली. त्यांनी १२ तारखेची एअर इंडिया फ्लाईटची लंडनला जाण्यासाठी तिकीट काढली. मात्र, एअर इंडिया ७८७-८ ड्रीमलायनर या विमानाचा अहमदाबादमधील मेघाणीनगर परिसरात भीषण अपघात घडला.

आनंदाचं रूपांतर शोकात

धवनीला सरप्राईज देण्यासाठी पालकांनी प्लॅन आखला. मात्र, तिला आपल्या आई वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळाली. आई-वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धवनीवर दुःखाचा डोंगर कोसळला. हे दुःख तिच्या आयुष्यात एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण करणारं ठरलं.

Air India Plane Crash
Pune News : खळबळ! पुण्याच्या मुठा नदीत तरंगताना आढळला मृतदेह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com