Plane Crash Video : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाचा भीषण अपघात झाला आहे. लंडनला निघालेले हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले. विमानात प्रवासी, कॅबिन क्रू यांच्यासह एकूण २४२ जण होते. ७०० फूटावर गेल्यानंतर हे विमान खाली कोसळले. हे विमान मेघानीनगरमधील सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळ्याने १५ डॉक्टर जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. विमान हॉस्टेलवर कोसळल्यानंतर घटनास्थळाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हॉस्टेलची भिंत पडल्याचे पाहायला मिळते. विमानामुळे इमारतीचा बराचसा भाग कोसळल्याचे व्हिडीओत दिसते.
Air India flight AI 171 हे विमान अतुल्य १, २, ३ आणि ४ इमारतींवर कोसळले तेव्हा हॉस्टेलमध्ये ५० ते ६० इंटर्न डॉक्टर होते. हे सर्व निवासी डॉक्टर्स आहेत, असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या व्हिडीओमधील इमारतींची अवस्था पाहून अपघात किती भयावह प्रकारचा होता हे लक्षात येते. या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन व्हिडीओद्वारे करण्यात आले आहे.
टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. तेथील ७० ते ८० टक्के परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. एनडीआरएफची ६ पथके मदतीसाठी रवाना झाली असून ९० जवान घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.