Kolkata Doctor Rape Murder Case : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देश हादरला होता. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टाने स्वत: या प्रकरणाची दखल घेत सुनावणी केली. सरन्यायाधीश चंद्रचूड (Dhananjaya Yeshwant Chandrachud) यांच्याबरोबर न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या, मनोज मिश्रासुद्धा या खंडपीठात होते. आज याप्रकरणाची सुनावणी झाली.
यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (CJI Chandrachud ) यांनी देशभरातील डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले. रुग्णालयांमध्ये त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, असे आश्वासनही दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड भडकले होते. आम्ही पण काम सोडून सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर बसू शकतो का? अशी कठोर टिप्पणी त्यांनी केली.
गुरुवारी (22 ऑगस्ट 2024) सुनावणीदरम्यान पश्चीम बंगाल राज्याचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला. सॉलिसिटर जनरल कोर्टात म्हणाले, " पश्चिम बंगालचा एक मंत्री म्हणतोय की आमच्या नेत्याविरोधात बोलणाऱ्यांची बोटे कापून टाकू." याला उत्तर देताना वकील कपिल सिब्बल म्हणाले की, अशा परिस्थितीत विरोधी पक्षाचे नेतेही गोळीबार करण्याबाबत बोलत आहेत, हे सांगावे लागेल.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी संप करणाऱ्या डॉक्टरांना कामावर परत येण्याचे भावनिक आवाहन केले. रुग्ण तुमची वाट पाहत आहेत, त्यामुळे कामावर परत या असं त्यांनी म्हटलं. कामावर परतल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही यावेळी चंद्रचूड यांनी डॉक्टरांना दिले.
न्याय आणि चिकित्सा यांना थांबवता येत नाही. आम्हीपण काम सोडून सुप्रीम कोर्टाच्या बाहेर बसू शकतो का ? एम्सचे डॉक्टर 13 दिवसांपासून कामावर नाहीत. हे योग्य नाही. रुग्ण खूप लांबून येतात. तुम्ही कामावर परत या, तुम्हाला कारवाईपासून संरक्षण देऊ, असे CJI DY चंद्रचूड म्हणाले.
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आम्ही राष्ट्रीय टास्क फोर्स तयार केला आहे. डिस्ट्रेस कॉल सिस्टम तयार करण्याचा सल्ला आम्ही आज देत आहोत. टास्क फोर्सने यासारख्या सर्व सूचनांचा विचार करावा असे चंद्रचूड म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.