PM Narendra Modi (File Photo) saam tv
देश विदेश

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

PM Narendra Modi AI Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) व्हिडिओ काँग्रेसने केला होता. या प्रकरणात आता दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nandkumar Joshi

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा एआय व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या प्रकरणात आता दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजपच्या तक्रारीवरून दिल्लीच्या नॉर्थ अॅव्हेन्यू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एफआयरमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या आयटी सेलला प्रमुख आरोपी करण्यात आले आहे.

बिहार काँग्रेसने १० सप्टेंबरला एआय व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई दाखवण्यात आल्या होत्या. यावरून काँग्रेसवर भाजपने संताप व्यक्त केला होता. काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे. देशातील सर्व माता आणि भगिनींचा हा अपमान आहे, असं भाजपने म्हटले होते.

भाजपचे दिल्लीचे नेते संकेत गुप्ता यांनी या प्रकरणी १२ सप्टेंबरला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचा ट्विटर) १० सप्टेंबरला एक डीपफेक/एआयद्वारे तयार केलेला व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईला दाखवण्यात आले होते. त्यांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अशा प्रकारची कृती भारताच्या सर्वोच्च संवैधानिक संस्थेचा अपमान आहे. महिलांची प्रतिष्ठा, विशेषतः मातृत्वाचा अपमान आहे. लोकशाही संस्थांवरचा हा आघात आहे. समाजात अशांतता, द्वेष आणि खोटं पसरवण्याचा हा प्रयत्न आहे, असं भाजप नेत्यानं दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्रींची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे. महिलांचा सन्मान, त्याग आणि बलिदानाचा अवमान करण्यात आला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. हे कृत्य केवळ वैयक्तिक हानीचा नाही तर, राष्ट्राची नैतिकता आणि लोकशाही संस्थांविरोधात केलेला गंभीर गुन्हा आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणात तात्काळ एफआयआर नोंदवून चौकशी करण्यात यावी, तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तो व्हिडिओ हटवण्यात यावा. आयपी लॉग आदींचा शोध घेण्यात यावा. दोषींवर कायदेशीर कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT