Ahmedabad Plane Crash x
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

Air India Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी झालेल्या प्रवाशांमध्ये २३ वर्षीय क्रिकेटपटूचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Plane Crash Accident : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर (एआय १७१) विमान खाली कोसळले. एअर इंडियाचे हे विमान मेघानीनगरमधील मेडिकल कॉलेज कॉम्प्लेक्समध्ये कोसळले. या दुर्घटनेमध्ये विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला. विश्वास कुमार रमेश हे प्रवासी या अपघातात वाचले. एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका क्रिकेटपटूचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमान दुर्घटनेमध्ये २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. दीर्घ पटेल हा मूळचा गुजरातचा होता. हडर्सफील्ड विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेत एमएससी पूर्ण केल्यानंतर दीर्घ लीड्स मॉडर्नियन्स क्रिकेट क्लबकडून खेळला होता. २०२४ मध्ये २०२४ मध्ये पदव्युत्तर पदवी घेत असताना त्याने २० सामन्यांमध्ये पहिल्या इलेव्हनसाठी ३१२ धावा केल्या आणि २९ बळी घेतले होते.

दीर्घ पटेल हा अहमदाबादवरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानात होता. विमान जेव्हा खाली कोसळले, तेव्हा मोठा स्फोट झाला. अपघातामध्ये दीर्घ पटेलचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हडर्सफील्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी आणि त्याच्या क्रिकेट क्लबने दीर्घ पटेलला श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केले आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये १२ जून रोजी मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने दुपारच्या सुमारास उड्डाण केले. उड्डाणानंतर हे विमान अवघ्या काही सेकंदांमध्ये मेघानीनगर परिसरात कोसळले. अपघाताच्या वेळी विमानात २४२ जण होते. यातील २४१ जणांचा अपघातात जीव गेला. तर विमान दुर्घटनेने मेघानीनगरमधील ३० हून अधिक जणांचा बळी घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT