Maharashtra Cabinet Decision : फडणवीस सरकारचे महत्त्वाचे १० निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय ठरलं?

Maharashtra Cabinet Decision News : मुख्यमंत्र्याच्या नेतृत्त्वामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत मुंबई मेट्रो, धारावी पुनवर्सन-पुनर्विकास प्रकल्प अशा १० मुद्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.
Maharashtra Cabinet Decision
Maharashtra Cabinet Decisionx
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुंबई मेट्रो, कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय, धारावी पुनवर्सन व पुनर्विकास प्रकल्प यांसारख्या गोष्टींबाबतच्या मोठ्या निर्णयांवर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री सचिवालयाद्वारे निर्णयाबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

• ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके येथील २९ हेक्टर ५२ आर जमीन. आदिवासी समाजातील होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन, रोजगार निर्मिती व आर्थिक विकासास चालना मिळणार. (महसूल विभाग)

• एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत. सार्वजनिक, खासगी भागिदारीतून हा राज्यातील पहिलाचा मोठा प्रकल्प. ग्रोथ सेंटरमुळे विदेशी गुंतवणूक आकर्षित होणार. (महसूल विभाग)

Maharashtra Cabinet Decision
Ramdas Athawale : राज ठाकरेंची भूमिका दररोज बदलते, त्यांना महायुतीत घेऊन फायदा नाही; रामदास आठवलेंचा रोखठोक निशाणा

• मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठासाठी आवश्यक मौजे पहाडी गोरेगाव येथील जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ. विद्यापीठाला स्व-मालकीची इमारत मिळणार. हजारो विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार. (महसूल विभाग)

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने, पुनवर्सन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार. योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार. (महसूल विभाग)

Maharashtra Cabinet Decision
Mumbai : मुंबईतील ७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका; स्लॅब कोसळला, भिंतीला तडे, ६० वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये भरते शाळा

• केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार. यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प. शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्वाचा प्रकल्प. (कृषि विभाग)

• महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर. कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार. (कृषि विभाग)

Maharashtra Cabinet Decision
Rapido Bike Driver Slap प्रकरणात मोठा ट्विस्ट! आधी तिने माझ्यावर हात उचलला अन् म्हणाली...; बाईकचालकाने सांगितला घटनाक्रम

मुंबई मेट्रो मार्ग-२अ, २ ब आणि ७ या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ. (नगरविकास विभाग)

• विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प आता "बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग).

• आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ. हयात जोडीदारालाही मानधन मिळणार. गौरव योजनेमध्ये सुधारणा. (सामान्य प्रशासन विभाग).

• अनिवासी भारतीयांच्या मुलांना, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार. विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवासी भारतीयांच्या व्याख्येत बदल. प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम, २०१५ मध्ये सुधारणा. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

Maharashtra Cabinet Decision
Team India : इंग्लंडमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का! मालिका सुरु होण्याआधीच दुखापतीमुळे दोन खेळाडू संघातून बाहेर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com