Mumbai : मुंबईतील ७०० विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका; स्लॅब कोसळला, भिंतीला तडे, ६० वर्षे जुन्या बिल्डिंगमध्ये भरते शाळा

Mumbai Schools : मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारतीला तडे गेले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती समोर आली आहे. शाळेची इमारत ६० वर्षे जुनी आहे. या परिस्थितीमुळे शाळेतील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.
Mumbai Schools
Mumbai Schools Saam Tv
Published On

मुंबई : आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शाळेचा पहिला दिवस असल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला गेल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन दप्तर, वह्या-पुस्तके अशा असंख्य नव्या गोष्टींमुळे विद्यार्थी देखील आनंदून गेले आहेत. पण शाळा सुरु झाल्याने मुंबईतील एका शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. पण का? चला जाणून घेऊयात...

अंधेरी पूर्वेतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे. सुमारे ६० वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. शाळेच्या इमारतींच्या भिंतींना ठिकठिकाणी मोठे तडे गेले आहेत. काही दिवसांपूर्वी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. या परिस्थितीमुळे शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.

Mumbai Schools
Air India : एसी बंद झाला, लहान मुलं रडायला लागली; विमान टेकऑफ होण्याआधी नेमकं काय झालं? पाहा व्हायरल व्हिडीओ

महानगरपालिकेच्या शाळेच्या इमारतीची बिकट अवस्था पाहून विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पालकांनी म्हटले आहे. या प्रकरणामध्ये पालकांनी तीव्र नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai Schools
Team India : इंग्लंडमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का! मालिका सुरु होण्याआधीच दुखापतीमुळे दोन खेळाडू संघातून बाहेर

या गंभीर स्थितीची दखल घेत अंधेरी आमदार मुरजी पटेल यांनी आज शाळेची पाहणी केली. शिक्षण विभागाच्या हलगर्जी कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पटेल यांनी शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची तातडीची मागणी केली आहे. 'शाळेतील इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि जीव दोन्ही संकटात आहेत. मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या इमारतीच्या नव्या बांधकामाची मागणी करणार आहे, असे आमदार मुरजी पटेल यांनी म्हटले आहे.

Mumbai Schools
Rapido Bike Driver Slap प्रकरणात मोठा ट्विस्ट! आधी तिने माझ्यावर हात उचलला अन् म्हणाली...; बाईकचालकाने सांगितला घटनाक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com