Ahmedabad Plane Crash  Saam Tv
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : कुणी वडिलांना गमावले, कुणी मुलगा, तर कुणी संपूर्ण…; विमान अपघातानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातल्या तब्बल १८ जणांनी जीव गमावलाय...यात विमानाचे मुख्य पायलट...केबिन क्रू आणि प्रवाशांचा समावेश आहे....ऐन तारुण्यात आपल्या जीवलगांना सोडून गेलेल्यांवरचा हा विशेष रिपोर्ट...

Yash Shirke

सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

1994 पासून पायलट म्हणून कार्यरत असलेल्या पवईतील जलवायू विहारमधील कॅप्टन सुमित सबरवाल यांचं घर..88 वर्षांचे त्यांचे वडील सुन्नपणे बसून आहेत..ज्या मुलाचा आधार घेऊन या वयात जगायचं तोच आधार आता नाहीसा झालाय..या वयात आता त्यांनी कुणाकडे बघून जगायंच....विमानात बसण्यापूर्वी पायलट सुमित यांनी घरी फोन केला..वडीलांना काळजी घ्या म्हणत लंडनला उतरल्यानंतर पुन्हा फोन करतो, असं सांगितलं. मात्र आता तो फोन कधीच येणार नाही...लग्न करून संसार थाटण्याची सुमित यांची स्वप्न नियतीनं धुळीस मिळवली .. या वयात वडिलांना एकाकी करून गेली...

बदलापूरचे दीपक पाठक गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियात काम करत होते.. कुठल्याही उड्डाणाआधी आईला सांगून निघण्याची सवय...यावेळीही आईला तसाच मेसेज केला. दीपक यांची आई अजूनही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलीय..

अहमदाबादमधल्या अपघातात क्रू मेंबर म्हणून पनवेलमधील मैथिली पाटील देखील होत्या.. अपघाताच्या एक दिवस आधी न्हावा गावातून मैथिली ड्युटीसाठी गेल्या. हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत मैथिली यांनी एअर इंडियात नोकरी मिळवली. त्यामुळे घरात मोठ्या असणाऱ्या मैथिलीच्या जाण्यानं घरातील कमावता हातचं निघून गेलाय. हीच परिस्थिती डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे यांची

दरम्यान अपघातात अपर्णा महाडिक यांचाही मृत्यू झालाय. अपर्णा या क्रू मेंबर म्हणून कार्यरत होत्या. अहमदाबाहून लंडनला निघालेय, हाच अपर्णा यांचा कुटुंबियांशी झालेला शेवटचा संवाद...

दुसरीकडे जुहू कोळीवाड्यातील साईनिता चक्रवर्तीनं एअर इंडियात नोकरी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. मात्र क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या साईनिताचा अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं कुटुंबियांना अश्रू अनावर झालेत.

दरम्यान क्रू मेंबर इराफन शेखचाही दुर्घटनेत मृत्यू झालाय. ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबीयांच्या भेटीला आलेल्या इराफनची ही ईद शेवटची ठरेल, असं त्यांच्या कुटुंबियांना कधीच वाटलं नव्हतं...

अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानं देशाला हादरवून सोडलयं. विमानात अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियाचं दुख व्यक्त करण्याच्या पलिकडचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार

Nishikant Dubey Mumbai Connection : मराठी माणसाला धमकी देणाऱ्या निशिकांत दुबेंचं मुंबई कनेक्शन; नोकरीही केली, कोट्यवधींची प्रॉपर्टीसुद्धा

Viral Video : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर पुन्हा एकत्र? लंडनच्या पार्टीतला व्हिडीओ व्हायरल

Taj Mahal: ताजमहाल बांधण्यासाठी किती वर्षे लागली?

Healthy Paneer Bowl: वर्कआउटनंतर काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक हवंय? मग 'हेल्दी पनीर बाउल' नक्की खा!

SCROLL FOR NEXT