Siddhi Hande
इस्त्रायल आणि इराणमधील युद्ध दिवसेंदिवस वाढत आहेत.या युद्धात इस्त्रायल इराणवर हल्ले करत आहे.
या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.
मिडिया रिपोर्टनुसार, इस्त्रायलने खामेनेई यांना मारण्यासाठी ब्लू स्पॅरो मिसाइलचा वापर केला आहे.
ब्लू स्पॅरो मिसाझल हे १००० किलोमीटरवरुनही अचूक ठिकाणी मारा करते.त्यामुळे खूप लांबूनदेखील ज्या ठिकाणी मारा करायचा आहे त्या ठिकाणी हे मिसाइल मारा करते.
ब्लू स्पॅरो मिसाईल इस्त्रायलची राफेल अॅडव्हान्स डिफेन्स सिस्टीम कंपनीने बनवली आहे. हे एक एअर लाँच बॅलिस्टिक मिसाइल म्हणजेच लढाऊ विमान आहे.
सुरुवातीला हे मिसाईल इस्त्रायलच्या एरो एअर डिफेन्स सिस्टीमची चाचणी घेण्यासाठी क्षेपणास्त्र म्हणून वापरले जात होते.यामध्ये ब्लॅक स्पॅरो, ब्लू स्पॅरो आणि सिल्व्हर स्पॅरोचा समावेश आहे.
ब्लू स्पॅरो मिसाईल ६.५ मीटर लांब, १९०० किलोग्रॅम वजनाचे आहे. हे क्षेपणास्त्र २००० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता ठेवते.
या मिसाईलची ताकद एवढी आहे की, एखाद्या टेबल किंवा खुर्चीवरदेखील ते अचूकपणे मारा करु शकते. यामुळे कितीही लांबून तुम्ही हे मिसाईल डागले तरी ते लांबपर्यंत जाऊन मारा करणार.