Shruti Vilas Kadam
सर्वप्रथम आपल्या चंद्र राशीच्या बीज मंत्राचा एक माळ (१०८ वेळा) जप करावा. राशीनुसार मंत्र जप केल्याने मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
यानंतर चंद्राचा बीज मंत्र एक माळ जपावा:ॐ श्रां श्रीं श्रौं सः सोमाय नमः। हा मंत्र मनःशांती आणि भावनिक संतुलनासाठी उपयुक्त मानला जातो.
जर तुम्हाला गुरू मंत्र प्राप्त झाला असेल तर त्याचा एक माळ जप करावा. गुरू मंत्र आध्यात्मिक प्रगतीसाठी सहाय्यक ठरतो.
आपल्या कुलदैवताचा मंत्र एक माळ जपावा. कुलदैवताची कृपा आणि संरक्षण मिळवण्यासाठी हा जप महत्त्वाचा मानला जातो.
आर्थिक स्थैर्यासाठी खालील मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र एक माळ जपावा:
ॐ श्रीं नमः किंवाॐ श्रीं ब्रीजी
रंगोत्सव खेळायचा असल्यास दुपारी १२ वाजेपर्यंत खेळावा आणि दुपारी १ च्या आधी जेवण करून घ्यावे. ग्रहणकाळात अन्न सेवन टाळावे, अशी परंपरा आहे.
ग्रहण मोक्षानंतर म्हणजे सायं. ६:४८ नंतर स्नान करावे. शक्य असल्यास मंत्रजप स्वतः करावा; अन्यथा युट्यूबवर ऐकू शकता. भीती न बाळगता श्रद्धेने जे शक्य आहे तेवढे उपाय करणे महत्त्वाचे आहे. हा सल्ला डॉ. तेजस लोखंडे (आरोग्यसौख्य) यांनी दिला आहे.
(टिप: सदर माहिती ही वाचक्यांच्या माहितीसाठी आहे. साम टिव्ही याला दुजोरा देत नाही)