Ahmedabad Plane Crash x
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेदरम्यान चमत्कार! भगवद्गीतेनंतर आता बाळकृष्णाची मूर्ती, कपडाही...

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनास्थळी बाळकृष्णाची मूर्ती सापडल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Plane Crash : अहमदाबादच्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. १२ जूनच्या दुपारी एअर इंडियाचे प्रवासी विमान लंडनसाठी निघाले होते. उड्डाणानंतर काही सेकंदांमध्येच विमान खाली कोसळले. हे विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाच्या जवळ असलेल्या मेघानीनगर या नागरी वस्तीत कोसळले. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

एअर इंडियाचे विमान मेघानीनगरच्या जेबी मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवत असलेले विद्यार्थी आणि आजूबाजूचे काहीजण या अपघातात मृत्युमुखी पडले. विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला. अपघातानंतर झालेल्या स्फोटात विमानाचे लोखंड देखील वितळले. अपघातानंतर घटनास्थळी शोधकार्य सुरु झाले. शोधमोहिमेदरम्यान, बचाव पथकाला भगवद्गीता सापडली.

अपघाताच्या घटनास्थळाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर भगवान कृष्णाच्या बालस्वरूपातील मूर्ती सापडल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. विमानाचे लोखंड वितळले, लोकांचा कोळसा झाला पण ही मूर्ती कशीकाय बचावली असे म्हणत व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने आश्चर्य व्यक्त केले आहे.

निखील सैनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'अहमदाबादमधील विमान अपघातात लागलेल्या भीषण आगीमुळे आसपासचे सर्वकाही वितळले, पण भगवान कृष्णाची ही मूर्ती पूर्णपणे सुरक्षित राहिली. त्यावरील कापडही शाबूत राहिले आहे. आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही, पण इतक्या उच्च तापमानातही मूर्तीला काहीच झालं नाही हे खरोखरच आश्चर्यकारक आहे', असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

SCROLL FOR NEXT