Ahmedabad Saam
देश विदेश

Air India Plane Crash: संतापजनक! विमान अपघातात रक्ताळलेलं स्त्रीचं शीर रस्त्यावर पडलं, बघ्यांनी सेल्फी काढली

Ahmedabad air India plane crash: गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरात गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात घडला. या अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरात गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात घडला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर काही सेकंदांतच हे विमान मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर विमानाने भीषण पेट घेतल्यामुळे अनेक प्रवाशांचे मृतदेह पूर्णपणे जळून कोळसा झाले होते. घटनास्थळी आगीचे लोट आणि धुराचे प्रचंड प्रमाण दिसून आले. अनेक प्रवाशांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर काहींनी एका महिला प्रवाशाचं रक्ताळलेलं शीरासोबत सेल्फी काढली आहे. तसेच त्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

माणुसकी संपली आहे का?

विमान अपघाताच्या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओमुळे सगळ्यांची मान शरमेनं खाली गेली आहे. एका महिला प्रवाशाचं रक्ताळलेलं शीर खाली पडलं होतं. अनेकांचे अवयव रस्त्यावर पडले होते. त्या शीरासोबत काही उपस्थितीतांनी सेल्फी काढला आहे. तर, काहींनी व्हिडिओ शूट करून शेअर केला आहे. या अमानवी कृत्यावरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर 'माणुसकी शिल्लक राहिली आहे का?'असा सवाल उपस्थित केला आहे. आजूबाजूची परिस्थित पाहता त्यांना मदत करण्याऐवजी लोक सेल्फी काढत असल्याचं पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

विमान अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केला. विमानाचे तुकडे झाले असून, विमानाचे पंख आणि अनेक भागांचे तुकडे झाले असल्याचं पाहायला मिळालं. सध्या अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : भाजीसाठी लागणारे वाटण जास्त काळ ताजे कसे ठेवावे? जाणून घ्या टिप्स

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT