Bollywood: 'मी दर महिन्याला प्रेग्नेंट राहायची', सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं सगळंच सांगितलं; लग्न अन् बाळ..

Latest Bollywood News: बॉलिवूडमधील बोल्ड अँड ब्युटीफूल अभिनेत्री विद्या बालन नेहमीच तिच्या स्पष्ट आणि बिनधास्त विधानामुळे चर्चेत असते. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या लग्नानंतरच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे.
Bollywood
BollywoodSaam
Published On

बॉलिवूड स्टार्स नेहमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील मोठे गुपित शेअर करताना दिसतात. बोल्ड अँड ब्युटीफूल बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनही आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी शेअर करते. तिने नुकतंच एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल मत मांडले होते. विद्याने दरमहा गर्भवती असल्याचा खुलासा केला. तिने केलेल्या विधानामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

विद्या बालनने २०१२ साली बॉलिवूडचे निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्यासोबत लग्न केलं होतं. तिनं एका मुलाखतीत आई होण्याबाबत मोठं विधान केलं होतं. विद्या बालनने आयडीडब्लूएशी बोलताना सांगितले की, '३३ व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. लग्नानंतर लोक मला आई कधी होणार? हा प्रश्न विचारत होते. लग्न करत नव्हते तर, लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारत होते. आता लग्नानंतर बाळ कधी होणार, आई कधी होणार?'असा प्रश्न विचारायला त्यांनी सुरूवात केली.

Bollywood
Sangli: नवऱ्याकडून शारीरिक संबंधाची मागणी, दुसऱ्या बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली; लग्नाच्या १५ दिवसानंतरच..

एक प्रसंगाची आठवण करून देत विद्या म्हणाली, 'लोक भेटल्यानंतर मला वारंवार विचारायचे तुला बाळ कधी होणार? लोक विचारायचे नेमकं कपड्यांमध्ये काय दिसत आहे? हा बेबी बंप आहे का? मी उत्तरात म्हणायची हो, नंतर नाही, असं उत्तर देत होती, मी प्रत्येक महिन्याला प्रेग्नेंट राहत होती', असं तिनं आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

Bollywood
Politics: अजित पवारांचा काँग्रेसला दे धक्का; बुलढाण्यातील महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार

विद्या बालन पुढे म्हणाली, 'मला वाटतं की, लोकांनी लग्न आणि मुलांशी संबंधित प्रश्न विचारणे थांबवावे. मला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे, हा सर्वस्व माझा निर्णय आहे', असं विद्या बालन म्हणाली. तसेच, 'लग्नानंतर तुम्हाला लोक जगू देणार नाही, कुटुंबापेक्षा समाजाला याविषयी कुतूहल असतं', असं विद्या बालन म्हणाली.

लग्नानंतर आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात. त्या सर्व समस्या लवकर संपत नाहीत. लग्न आणि बाळ या दोन गोष्टी समस्यावर तोडगा नसू शकतं,असं विद्या बालनने मुलाखतीत स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com