Agni-5 Missile Test Twitter/@bhupendrasingho
देश विदेश

Agni-5 Missile: अग्नि-5 क्षेपणास्त्र होणार आणखी घातक; 7000 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता, चीन-पाकची खैर नाही

Agni-5 Missile: भारत आपली प्रत्युत्तर स्ट्राइक क्षमता बळकट करत आहे आणि पाणबुडीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकासावरही काम करत आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Agni-5 Missile News: अण्वस्त्र सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 च्या यशस्वी चाचणीनंतर काही दिवसांनंतर, भारताने आता 7,000 किमीच्या पलीकडे असलेल्या लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता विकसित केली आहे. संरक्षण मंत्रालाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, क्षेपणास्त्राच्या नवीन जास्तीत जास्त संभाव्य श्रेणीची चाचणी करण्याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. (Agni-5 Missile Test News)

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आता स्टील मटेरियलच्या जागी कंपोझिट मटेरियलचा वापर करुन अग्नि-5 (Agni5 Missile) क्षेपणास्त्राचे वजन कमी करण्यात यशस्वी झाली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, "क्षेपणास्त्र प्रणालीचे वजन 20 टक्क्यांहून अधिक आहे आणि जर सरकारला हवे असेल तर आण्विक सक्षम क्षेपणास्त्र 7,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जाऊ शकते."

सूत्रांनी अग्नी-3 क्षेपणास्त्राचेही उदाहरण दिले, ज्याचे वजन सुमारे 40 टन आहे आणि ते 3,000 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते. परंतु अग्नि-4चं वजन 20 टनांपेक्षा थोडेच अधिक आहे ज्यामुळे ते लांब पल्ला गाठू शकतं. किंबहुना, स्ट्रॅटेजिक कमांड फोर्सचा भाग असलेल्या क्षेपणास्त्राची विस्तारित श्रेणी युद्धाच्या वेळी रणनीतीकारांना विविध पर्याय देईल. (Latest Marathi News)

भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम मुख्यतः चीन आणि पाकिस्तानसह त्याच्या शत्रूंविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी आहे, कारण भारताचं नो फर्स्ट यूज हे धोरण आहे, या धोरणामुळे भारत कोणत्याही देशावर प्रथम अण्वस्त्र हत्याराचा वापर करणार नाही. त्यामुळेच भारत आपली प्रत्युत्तर स्ट्राइक क्षमता बळकट करत आहे आणि पाणबुडीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विकासावरही काम करत आहे. (Maharashtra News)

भारताने गुरुवारी रात्री अग्नी-5 आण्विक सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, ज्यामध्ये हे क्षेपणास्त्र 5400 किमी अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. क्षेपणास्त्रावरील नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रमाणित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती, जी आता पूर्वीपेक्षा खूपच हलकी आहे.

यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून अग्नी-5 या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. तीन-स्टेज सॉलिड इंधन इंजिन वापरणारे हे क्षेपणास्त्र उच्च अचूकतेसह 5,000 किमी पर्यंतचे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे, असे संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले होते की अग्नी-5 ची यशस्वी चाचणी भारताच्या 'विश्वासार्ह किमान प्रतिबंध' (‘विश्वसनीय न्यूनतम प्रतिरोध’) धोरणाच्या अनुषंगाने आहे, जी 'प्रथम वापर नाही' (‘नो फर्स्ट यूज’) या धोरणाला अधोरिखित करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT