Chandrakant Patil Today News : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांतदादांनी शाई हल्ल्याचा धसकाच घेतल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे, आज पिंपरी चिंचवडच्या सांगवी येथील एका कार्यक्रमात चंद्रकांतदादांनी आपला चेहरा चक्क फेसशिल्डने कव्हर केल्याचं पाहायलं मिळालं. आपल्यावर पुन्हा शाई हल्ला झाल्यास त्यातून चेहऱ्यावर शाई पडू नये यासाठी चंंद्रकांत पाटील यांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. त्यांनी फेसशिल्ड घातल्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. (Maharashtra News)
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर १० डिसेंबरला पिंपरी-चिंचवड शहरात शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील पवनाथाडी जत्रेच्या उद्घाटनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दाखल झाले होते. (Latest Marathi News)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विकास लोले यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तरी देखील आपल्यावर कुणी शाई फेकून हल्ला करू नये म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात आपल्या चेहऱ्यावर फेस शील्ड परिधान केली होती. (Ink Attack On Chandrakant Patil)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाईफेकीच्या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत शाईफेकीला विरोध दर्शवला होता. फडणवीस म्हणाले होते की, चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे अयोग्य नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शब्द चुकला असेल तरी आशय लक्षात घेतला पाहिजे. मी माध्यमांना दोष देत नाही पण आशय दाखवायला पाहीजे. जे आंदोलन करत आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही अश्या पद्धतीने टार्गेट करणं हे योग्य नाही असं म्हणत त्यांनी शाईफेकीचा निषेध केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.