Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचं उल्लंघन करणं पडेल महागात; भरावा लागणार 'इतका' दंड

Samruddhi Mahamarg Today News: समृद्धीचे लोकार्पण झाल्यानंतर शेकडो वाहने या महामार्गावरून धावत आहेत. समृद्धी महामार्गावर महामार्गावर प्रवासाची वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
speed interceptor on Samruddhi Mahamarg
speed interceptor on Samruddhi MahamargSaam TV
Published On

सचिन बनसोडे, शिर्डी

Samriddhi Highway News: नागपूर ते शिर्डी या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नुकताच सुरू झाला आहे. या महामार्गावर काही वाहन चालक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहने चालवत असल्याचे समोर आले आहे. मात्र आता नियमांचे उल्लंघन करणे वाहन चालकांना महागात पाडणार आहे. कारण समृद्धी महामार्गावर ठिक-ठिकाणी पोलिसांचे इंटरसेप्टर (speed interceptor vehicle) वाहन तैनात करण्यात आले असून वाहन मर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. (Samruddhi Mahamarg Today News)

speed interceptor on Samruddhi Mahamarg
Aurangabad RTO: नादच खुळा! वाहनांच्या चॉईस नंबरसाठी औरंगाबादकरांनी मोजले कोट्यवधी रुपये; '9' नंबर सर्वात लकी...

समृद्धीचे लोकार्पण झाल्यानंतर शेकडो वाहने या महामार्गावरून धावत आहेत. समृद्धी महामार्गावर महामार्गावर प्रवासाची वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. छोट्या कारसाठी १२० किमी प्रतीतास, मालवाहतुक वाहनांसाठी ८० किमी प्रतितास तर मोठ्या प्रवासी वाहनांसाठी १०० किमी प्रतितास असा वेग निश्चित करण्यात आला आहे. ही वेगमर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. (Breaking Marathi News)

नागपूर ते शिर्डी प्रवास करताना कारसाठी 900 रुपये टोल आहे. मात्र वेगमर्यांदा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. नागपूर ते शिर्डी या ५४० किमी अंतरात ठिकठिकाणी महामार्ग पोलिसांची इंटरसेप्टपर वाहने तैनात करण्यात आली आहेत. (Samruddhi Mahamarg Speed Limit)

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचं (Samruddhi Highway) लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच वायफळ टोल नाक्यावर दोन कारमध्ये अपघात झाल्याचे समोर आले होते. या घटनेत सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नसले तरी दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले होते. सोबतच एक स्विफ्ट कार आणि मर्सिडीज कारचीही धडक झाली होती. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात वाढत आहे. त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी आता नियम कडक करण्यात आले आहेत.

speed interceptor on Samruddhi Mahamarg
Malegaon Bomb Blast Case: कर्नल पुरोहितांवरील पुस्तकावरुन वाद; पुरोगामी संघटनांचा पुस्तक प्रकाशनाला विरोध

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये -

• लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५ • लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड) • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२ • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६ • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com