ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Youtube चॅनल सुरु केल्यावर सर्वात पहिले डोक्यात हाच प्रश्न येतो. तर जाणून घ्या १००० व्हूजचे यूट्यूब किती रुपये देतो.
पण त्याआधी, हे जाणून घ्या की YouTube वरील प्रत्येक कॅटेगरीची कमाई वेगळी असते.
याशिवाय, तुम्ही व्हिडिओ कोणत्या देशातून बनवत आहात यावरही कमाई अवलंबून असते.
साधारणपणे, YouTube प्रत्येक १००० व्ह्यूजसाठी २० रुपये ते १५० रुपये देते. तर, भारतात, सरासरी, YouTube वरून प्रति १००० व्ह्यूजमागे ३० रुपये ते ८० रुपये कमाई होते.
जर कॅटेगीरीबद्दल बघितले गेले तर, फायनान्स किंवा तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात, १००० व्ह्यूजमधून जास्त कमाई करणे शक्य असते.
मनोरंजन आणि व्हीलॉगिंग चॅनेलचे RPM (Revenue Per Mille) कमी आहे.
याशिवाय, YouTube ची कमाई जाहिरातींची संख्या, प्रेक्षकांचे स्थान आणि पाहण्याच्या वेळेवर अवलंबून असते.