Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५, महापालिकेचे आरक्षण सोडत, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान, राजधानी दिल्लीमध्ये कार ब्लास्ट, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कशीश पार्क या ठिकाणी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या इमारतीच्या जाळीला अचानक आग लागली होती. सदरचा घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये प्लास्टिक चा जाळीला आग लागली होती.आग आटोक्यात आली आहे.

पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी अपडेट, शीतल तेजवानीची मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली क्रिमिनल रिट पिटीशन

दाखल असलेला गुन्हा रद्द करावा अशी तेजवानी यांची न्यायालयाला विनंती

तातडीची सुनावणी देण्यास मात्र मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

सुनावणी घेण्यास दोन ते चार आठवड्यांचा अवधी लागणार

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर कल्याण स्टेशनवर सुरक्षा यंत्रणा सतर्क, दुसऱ्या दिवशीही कसून तपासणी

दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह परिसरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे,लाखो प्रवाशी रोज या स्थानकावर प्रवास करत असतात.यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावरही सुरक्षा वाढवण्यात आली असून रेल्वे आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांकडून परिसरात तपासणी मोहीम राबवली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील वाढत्या बिबट्यांचा कहर, अतिसंवेदनशील गांवामध्ये एआय प्रणाली

पुणे जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीतील माहिती

बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन

२४ तास सुरू राहणाऱ्या नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १८०० ३०३३ असा आहे.

खोपोलीमध्ये रेल्वेने बैलाला उडवलं, मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली

सहा वाजून दोन मिनिटांनी खोपोलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला झाला अपघात

मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, मराठा समाजाची मागणी

मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा पुरवण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलन

पुण्यातील स्वारगेट चौकात मराठा समाजाचे आंदोलन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते मराठा समाजातील बांधवांनी निवेदन

सोलापूर महापालिका निवडणूक आरक्षण जाहीर; राजेश काळे, मनोज शेजवाळ, प्रवीण निकाळजे यांची अडचण

संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत मंगळवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

निलेश घायवळ टोळीवर अजून एक मकोका

कोथरूड पोलिसांकडून घायवळ टोळीवर तिसरा मकोका

गायवळ याच्यासह त्याचा भाऊ सचिन घायवळ याच्यावर देखील मोका

वारजे पोलिसांमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता

याच प्रकरणी निलेश घायवळ टोळीवर आता मोका लावण्यात आला आहे.

पारोळा-एरंडोल नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेची युती

पारोळा-एरंडोल नगरपरिषद निवडणुकीत भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेची युती जाहीर झाली आहे.या युतीमध्ये मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलण्यात आले आहे.आज पारोळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजप आमदार मंगेश चव्हाण व शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली.

युती संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कोणताही प्रस्ताव आला नाही त्यामुळे त्यांचा युतीत समावेश नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. युतीमध्ये एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भाजपला तर पारोळ्याचे नगराध्यक्ष पद शिंदेंच्या शिवसेनेला देण्याबाबत एकमत झाले आहे.

इगतपुरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपच्या गळाला

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा ठाकरे गटाला मोठा धक्का.

ठाकरे गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपच्या गळाला

३५ वर्षांपासून इगतपुरीत सत्तेवर असलेले नगरसेवक व नगराध्यक्षांचा समावेश

नगराध्यक्ष संजय इंदुलकर करणार भाजपात प्रवेश

Pune : पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण, व्यवहाराची स्वतंत्र विभागनिहाय तपासणी होणार

पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण

जमिनीचा सातबारा, त्यातील फेरफार नोंदी व खरेदी व्यवहाराची स्वतंत्र विभागनिहाय तपासणी होणार

जिल्हाधिकारी, जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक या तिघांनाही स्वतंत्र तपास करून तो अहवाल समितीच्या अध्यक्षांकडे द्यावा लागणार

राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचे आदेश

राज्य सरकारने समितीला अहवाल देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे

Mumbai : डॉक्टर निर्भया यांना न्याय मिळण्यासाठी आझाद मैदान येथे आंदोलन

डॉक्टर निर्भया यांना न्याय मिळण्यासाठी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येत आहे. अखिल भारतीय जनतावादी महिला संघटना मुंबई जिल्हा कमिटी, डेमोक्रॅटिक युज फेडरेशन ऑफ इंडिया, स्टुडेटस फेडरेशन ऑफ इंडिया, कामकाजी महिला समन्वय समिती आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. आंदोलनात महिलांचा देखील सहभाग आहे.

Yavatmal : यवतमाळमध्ये धडकला ठेवीदारांचा मोर्चा

यवतमाळच्या नेर येथील अष्टविनायक काॅ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखांमध्ये ठेवलेली ठेवी परत मिळावी, या प्रमुख मागणीसाठी नेर तालुक्यातील शेकडो ठेवीदारांनी जिल्हाधिकारी,एसपी कार्यालयावर धडक दिली.

Mumbai : मुंबईतील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश 

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत चेंबूर विधानसभेतील वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर...

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

या निवडणुकीत पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागांतील एकूण ७८ नगरसेवक पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

Pune: रूपाली ठोंबरे पाटील उद्या घेणार अजित पवारांची भेट

रूपाली ठोंबरे पाटील उद्या घेणार अजित पवारांची भेट

उद्या अजित पवार पुणे दौऱ्यावर

प्रवक्तेपदावरून काढून टाकल्यानंतर रूपाली ठोंबरे घेणार अजित पवारांची भेट

करणे दाखवा नोटीस दिल्यावर तात्काळ रूपाली ठोंबरे यांचं पद पक्षाने काढून घेतलं होतं

रूपाली ठोंबरे यांना दोन्ही शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर

"प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे," ठोंबरे यांची सोशल मिडिया पोस्ट

काय आहे रुळली ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट?

शेतकरीकन्या डॉ. संपदा मुंडे यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला.

या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार

माझा आवाज दाबला जाईल?

“प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे.”

आमचा इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही;

गरज पडली तर “ख्वाडा” करणाऱ्यांचा आहे.

Parbhani: परभणी शहर महापालिका सदस्यांचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

परभणी शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी प्रवर्गातील सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले आहेत आज बी रघुनाथ सभागृह येथे महानगरपालिकेच्या वतीने प्रभात आरक्षण जाहीर करण्यात आले आहे या आरक्षणामध्ये एकूण 65 सदस्यांपैकी 33 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत आरक्षणासाठी 2011 ची जनगणना ग्राह्य धरण्यात आली परभणी महानगरपालिका सभागृहात एकूण 65 सदस्य असून 33 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे सर्वसाधारण 39 जागांपैकी महिलांसाठी एकोणवीस अनुजाची आठ पैकी चार जागा महिलांसाठी ना. मा . प्र च्या 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत अनुसूचित जातीची असलेल्या एक जागा महिलांसाठी राखी आहे ह्या सर्व जागा वाटप करताना विद्यार्थ्यांच्या साह्याने चिट्ट्या काढत जागांचे वर्गीकरण करण्यात आले आहे आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता इच्छुक उमेदवार हे कामाला लागलेले चित्र पाहायला मिळणार आहे

सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर

सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आरक्षण सोडत जाहीर...

102 जागांपैकी 50 टक्के जागा 51 महिलांसाठी राखीव...

खुल्या प्रवर्गासाठी 58,ओबीसी प्रवर्ग 27, अनुसूचित जातीसाठी 15 प्रवर्ग निश्चित आणि 2 अनुसूचित जमातीसाठी प्रवर्ग निश्चित...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 31 जानेवारीच्या आत घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगर पालिका निवडणुका जाहीर ...

या आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांना धक्का, अनेक इच्छुक उमेदवारांचे स्वप्नभंग

अंतिम आरक्षण सोडत 2 डिसेंबर ला जाहीर होणार...

Nanded: नांदेडमध्ये सकल मराठा समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. हत्येचा कट रचणाऱ्या खऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या मराठा बांधवांनी केली आहे. या धरणे आंदोलनात मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मनमाड रेल्वे स्थानकात डॉग स्क्वाड पथकाद्वारे तपासणी

दिल्लीतील लालकिल्ल्या जवळ झालेल्या बाँब ब्लास्ट नंतर संपूर्ण देशात हायलर्ट देण्यात आला

नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे जंक्शन असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकात काल रात्री पासून रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस अलर्ट मोडवर असल्याचे पहायला मिळत आहे

संपूर्ण रेल्वे परिसर डॉग स्क्वाड द्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी करत आहे,तर रेल्वे फलाटावर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे

Shirdi News : शिर्डीत RSS आणि भाजपाचा जुन्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय

शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची चिन्हे असतानाच आता नवीन ट्विस्ट बघायला मिळतोय..

विखे पाटलांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या RSS आणि भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय घेतलाय.

संघाचे जेष्ठ कार्यकर्ते बाबुजी पुरोहित आणि संघ प्रचारक मुलगा विराट पुरोहित यांच्या नेतृत्वात निष्ठावान कार्यकर्त्यांची मोट बांधली जात आहे.

Nashik : नाशिक मनपाचे आरक्षण सोडत जाहीर; उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला वेग

नाशिक मनपाचे आरक्षण सोडत जाहीर, उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला येणार वेग

नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. एकूण ३१ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे.

सहा विभागांमध्ये ही सोडत पार पडली असून त्यात पंचवटी, पश्चिम, सातपूर, पूर्व, नाशिकरोड आणि सिडको विभागांचा समावेश आहे.

पंचवटी आणि सातपूर विभागात अनु. जाती, अनु. जमाती आणि ओबीसी महिलांना अधिक संधी मिळाल्या आहेत, तर पश्चिम आणि सिडको विभागात सर्वसाधारण महिलांसाठी जागा जास्त आहेत.

अशा प्रकारे सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देणारी ही आरक्षण रचना निश्चित झाली असून, आता राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.

Pune News : पुणे महानगरपालिकेकडून आंदेकरांच्या वारकरी भवन वर कारवाई

पुणे महानगरपालिकेकडून आंदेकरांच्या वारकरी भवन वर कारवाई

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस नाही

नोटीस न महानगरपालिकेचे अधिकारी उत्तर देत नाहीत

कुठली नोटीस नसताना कारवाई केल्याचा वकिलांचा आरोप

Kolhapur News : कोल्हापुरात ताराबाई पार्क परिसरात बिबट्याचा शिरकाव

कोल्हापुरातल्या मध्यवर्तीने ठिकाणी शिरला बिबट्या

ताराबाई पार्क परिसरातील एम एस ई बी कार्यालय परिसरात शिरला बिबट्या

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम दाखल

Akola News : प्रकाश आंबेडकरांकडून महाविकास आघाडीवर मोठा आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर अत्यंत मोठा आरोप केलाय.

महाविकास आघाडीचा प्रमुख सूत्रधार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच असल्यास ते म्हणालेत. मोदींच्या इशारावरच महाविकास आघाडी सुरू असून त्यांनी दिलेला कार्यक्रमास ते राबवत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाये.

आपल्याला भाजपने अनेकदा युतीची खुली ऑफर दिली होती. मात्र आपण आपली विचारधारा सोडली नसल्यास आंबेडकर म्हणालेत.

मात्र, महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे मोदींच्या इशारावर चालत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तर नरेंद्र मोदी असेपर्यत आपल्याला एकटच लढावं लागणार, अशी परिस्थिती असल्याचंही आंबेडकर म्हणाले.

दिल्ली स्पोट प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी RSSच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले

दिल्ली स्पोट प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातून मोठी प्रतिक्रिया समोर आलीये. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढलेये. या स्पोटमागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय. दरम्यान, देशात ठीक-ठिकाणी झालेल्या स्पोटचा उल्लेख करत आंबेडकरांनी RSSच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

Nashik News : दहशत माजवणाऱ्या इसमाची नाशिक पोलिसांनी काढली धिंड

नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपावर फाटकी नोट पेट्रोल पंप कर्मचाऱ्याने घेतली नाही, म्हणून पेट्रोल पंप चालकाला तलवारीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील ग्राहकांवर तलवार उगारून दहशत निर्माण करण्याचा एक व्हिडिओ समोर आला होता.

या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी संबंधित दहशत वाजवणाऱ्या इसमाला बेड्या ठोकत पॉलिसी खाक्या दाखवला आहे. नागरिकांमधील दहशत कमी व्हावी, यासाठी पोलिसांनी हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या या इसमाची त्याच परिसरातून धिंडही काढली, नाशिक पोलिसांच्या या कारवाईच नाशिककरांनी स्वागत केल आहे.

Narendra Modi : दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांना सोडणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला.

हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 च्या बाहेर झाला.

या हल्ल्यात 9 लोकांचं निधन झालं असून 20 जण जखमी आहेत.

या स्फोटप्रकरणी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, दिल्ली स्फोटातील गुन्हेगारांना सोडणार नाही

मी अपक्ष खासदार,तरीही मंत्री, अधिकारी मला घाबरतात - खासदार विशाल पाटील

मी अपक्ष खासदार असलो,तरी मंत्री, अधिकारी मला घाबरतात,असं विधान सांगलीच्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केले आहे.तसेच पालकमंत्र्यांच्या बरोबर दिसण्यावरून आपल्यावर टीका होते, पण त्यांच्याकडे जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ल्या कशा मिळणार नाहीत,असे विधान देखील विशाल पाटलांनी करत स्थानिक आमदारांच्या बरोबर वैचारिक वाद असतात, पण निवडणूकीत आम्ही एकमेकांचा प्रचार करू,असे देखील खासदार विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले,सांगलीच्या मिरजेमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी,ते बोलत होते.

Pune: पुणे महानगरपालिकेकडून आंदेकरांच्या वारकरी भवनवर कारवाई

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस नाही

नोटीस न महानगरपालिकेचे अधिकारी उत्तर देत नाहीत

कुठली नोटीस नसताना कारवाई केल्याचा वकिलांचा आरोप

Satara: साताऱ्यात पार पडली दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धा

पारंपरिक मराठी युद्धकला जपणाऱ्या दुसऱ्या राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2025 साताऱ्यातील जोशीविहिर येथे पार पडल्या.रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि स्पोर्ट्स दांडपट्टा असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील मोझर यांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी, पदकं आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत आता सुरू होत आहे. तत्पूर्वीच आरोग्य विभागाचे एक पथक हॉलच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे. आरक्षण सोडतीमध्ये अपेक्षित असलेले आरक्षण आले नाही किंवा इच्छुकांच्या प्रभागात दुसरेच आरक्षण आले तर एखाद्याला धक्का बसला आणि त्याची तब्येत अचानक खालावली तर त्याच्यावर तातडीने उपचार व्हावे यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ही उपाय योजना केली आहे.

Pune: पुणे महापालिकेची आरक्षण सोडत आज निघणार

इच्छुक उमेदवाराकडे सोडतीकडे लक्ष

धाकधूक वाढली काही वेळात आरक्षण निघणार

41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आरक्षण सोडत होणार

पुणे महापालिकेत 83 जागा महिलांसाठी तर 82 जागा पुरुषांसाठी असणार

महिलांच्या 83 जागामध्ये महिला खुला प्रवर्ग 48,ओबीसी महिला 23,एसी महिला 11, एसटी महिला 1 अशा जागा होणार

तर पुरुष मध्ये सर्वसाधारण 48,ओबीसी सर्वसाधारण 22,एस सी पुरुष 11, एस टी पुरुष 1

गणेश कला क्रीडामंच येथे सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत सुरु होणार

Pune: पुण्यात आंदेकर टोळीला अजून एक दणका

पुण्यात आंदेकर टोळीने अनधिकृतपणे बांधलेलं वारकरी भवन पडण्यास सुरूवात

आंदेकर टोळी पुन्हा पोलिसांच्या रडारवर

आंदेकर टोळीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू

मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात

कणकवलीतील भाजपच्या बॅनर वरून एकनाथ शिंदे आणि आमदार निलेश राणे यांचे फोटो हटवले

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या महायुती होणार की नाही यावर अजून शिक्कामोर्तब झालं नाही तरी देखील काल कणकवली शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुती मधील सर्वच नेत्यांचे फोटो असलेली कमान शहरात उभी करण्यात आली होती. त्यानंतर याची बातमी प्रसारित झाल्यानंतर महायुती झाली अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर आज या कमानीवरील महायुती मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार निलेश राणे यांचे फोटो या बॅनर वरून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे कणकवलीत युती होणार नसल्याचे या बॅनर वरून आता दिसत आहे. मात्र युती संदर्भात अजून अधिकृत कोणतीही घोषणा झाली नाही. अशातच हे फोटो हटविण्यात आल्यामुळे एकच चर्चा रंगली आहे.

Gadchiroli: चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा या गावातील रानटी डुकरांमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

विदर्भातील गडचिरोली जिल्हा भाताच्या शेतीच्या लागवडीसाठी ओळखला जातो आणि धानाची लागवड झालेली आहे मात्र पावसाने तर साथ दिली नाही आणि जे काही शेतातील धान वाचले होते मात्र ते धान आता रानटी डुक्कर पुन्हा येऊन धुमाकूड घालून नास - धूस करीत असल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदील झालेला आहे शेतकऱ्याने करायचं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्याला आज पडलेला आहे

BJP: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भीमराव धोंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश..

बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे शक्ती प्रदर्शन करत उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रवेश करणार आहेत.. सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे योगदान असलेल्या भीमराव धोंडे यांच्या प्रवेशामुळे आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस यांचे डोकेदुखी वाढणार आहे. उद्या राष्ट्रवादी मुंबई येथील भवन येथे हजारो कार्यकर्तासह प्रवेश सोहळा होणार आहे. तत्पूर्वी भीमराव धोंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर तोफ डागत.. विकास कामांमध्ये अडथळा आणत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत.. पंकजाताई सोबत हे माझं वय नाही मात्र स्थानिक आमदाराच्या विरोधामुळेच मी पक्ष सोडत आहे असे भीमराव धोंडे यांनी सांगितलं.

नागपूरमध्ये महाविकास आघडतीतील उबाठा सेनेला कॉंग्रेसकडून जोरदार धक्का...

- नागपूर महानगर पालिका निवडणुकांचा तोंडावर महाविकास आघडतीतील उबाठा सेनेला कॉंग्रेसकडून जोरदार धक्का...

- ठाकरे सेनेचे माजी शहर अध्यक्ष दीपक कापसे यांनी कार्यकर्त्यांसह केला काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

- काँग्रेसमध्ये असलेले आणि नंतर ठाकरे गटात प्रवेश केलेले दीपक कापसे आपल्या कार्यकर्त्यांसह परतले स्वगृही

- दीपक कापसे यांनी कॉंग्रेसचे नेते तथा आमदार विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत केला काँग्रेसपक्षात कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश

- दीपक कापसे हे आधी काँग्रेस मध्ये होते..मात्र काही कारणास्तव त्यांनी ठाकरे सेनेत गेले होते आता निवडणुकांचा तोंडावर घरवापसी झाली...

- काँग्रेसची विचारधारा सगळ्यांना घेऊन चालणारी असल्याने आणि आधी पासूनच काँग्रेसी असल्याने आपल्या विचारधारेच्या पक्षात आल्याचं मत दीपक कापसे यांनी व्यक्त केलं.

- तर आमदार विकास ठाकरे यांनी दीपक कापसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांच काँग्रेसचा दुपट्टा घालत पक्षात स्वागत केलं. निवडणुकीच्या तोंडावर झालेंल्या प्रवेशाने नक्कीच फायदा होणार.

आळंदीच्या यात्रेला जाणाऱ्या दिंडीला भरधाव कंटेनरची जोरदार धडक

उरण पनवेल येथून कार्तिकी एकादशीला आळंदी च्या यात्रेला जाणाऱ्या पायी दिंडीमध्ये सकाळच्या सुमारास भरधाव कंटेनर घुसल्याने एका वारकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सहा वारकरी जखमी झाले आहे. ही भीषण घटना मावळ तालुक्यातील कामशेत मधील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर घडले आहे. अपघातानंतर परिसरातील तरुण, संतप्त वारकरी व ग्रामस्थांनी महामार्ग रस्ता रोको करून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. जखमींना तात्काळ कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पालखी रात्री कामशेत या ठिकाणी मुक्कामी होती येथून सकाळी सुमारास आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली आहे. तीन वर्षांपूर्वी जुन्या मुंबई पुणे हायवे वरील मावळतील सातेगाव या ठिकाणी अशाच प्रकारे पायी वारीमध्ये एक चार चाकी गाडी घुसून अपघात झाला होता. अपघाताची घटना घडल्यानंतर सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो ,मात्र तेव्हा सुद्धा या पालख्या मार्गस्थ होत असताना त्यावेळी त्या त्या स्थानिक पोलीस स्थानकांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवली जात नाही. मात्र या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले आहे

Sangli: सांगलीत कृष्णामाईच्या काठी थंडीचा 'गुलाबी' साज..

सांगलीच्या पलूस तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर गुलाबी थंडीची एक सुंदर आणि आल्हाददायक धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असला, तरी या गारठ्याने नदीकाठच्या वातावरणाला एक मोहक आणि शांत रूप प्राप्त झाले आहे. पहाटेच्या वेळी नदीच्या पाण्यावरून वाहणारी गार हवा आणि त्यावर हलके धुकं यामुळे परिसर एखाद्या चित्रांत रेखाटलेल्या दृश्याप्रमाणे भासत आहे.

Wardha: वर्ध्यात सहा नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात

- जिल्ह्यातील सहा नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात

- पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाहीय

- जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, सिंदी, देवळी व पुलगाव नगरपालिकेची आहे निवडणूक

- वर्धा येथे २० प्रभागांतून ४०, हिंगणघाटमध्ये २० प्रभागांतून ४०, आर्वी येथे १२ प्रभागातून २५, पुलगाव येथे १० प्रभागांतून २१, देवळी येथे १० प्रभागांतून २० आणि सिंदी (रेल्वे) येथे १० प्रभागांतून २० नगसेवक द्यायचे आहेत निवडून

- राजकीय पक्षांच्या उमेदवारी करीता लॉबीग सुरूच

- येत्या दोन दिवसात होणार सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर

- सहाही नगरपालिकेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपा आणी काँग्रेस मध्ये चुरस

- भाजपाची उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांकडे इच्छुक उमेदवारची लॉबीग

- जिल्ह्यातील सहा पालिकांमध्ये एकूण ८२ प्रभागांमधून १६६ सदस्य निवडून येणार आहे

Delhi: दिल्ली विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात आणणार, आम आदमी पार्टीच्या माजी मंत्री राखी बिर्ला यांचे वक्तव्य

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने शिक्षण,आरोग्य,पाणी आणि वीज या मूलभूत सेवांमध्ये क्रांती केली, तसेच हाच विकासाचा मॉडेल महाराष्ट्रातही आणायचा आहे असे वक्तव्य दिल्ली विधानसभेच्या माजी उपसभापती व माजी कॅबिनेट मंत्री राखी बिर्ला यांनी केले. त्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेत आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. यावेळी पुरूषांसह हजारो महिलांची उपस्थिती होती.या कार्यकर्ता मेळाव्यात आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून नम्रता नितीन गवळी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून आता आम आदमी पार्टीने सुद्धा अमृत जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे

Pune: पुणे अहिल्यानगर महामार्गावर कामरगाव येथे बिबट्याचा अपघात

बिबट्याला अवजड वाहनाची धडक

अपघातात बिबट जखमी पाय आणि पाठीला गंभीर दुखापत

जखमी बिबट महामार्गावर जखमी अवस्थेत मात्र बिबट्याच्या बचावासाठी कोन्हीही थांबले नाही

बिबट महामार्गावर जखमी अवस्थेत पडुन राहिला एक तासाने वनविभागाचे कर्मचारी दाखल होऊन बिबट्याला उपचारासाठी घेऊन गेले

Jalna: जालन्यातील राजुर येथे कापड दुकानात चोरी करणारे दोन चोरटे अटकेत

जालन्यातील राजुर येथे कापड दुकानात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केलंय.विनोद काळे आणि लक्ष्मण फुके अशी संशयित आरोपींची नावे आहेत.जालन्यातील हसनाबाद पोलिसांनी हि कारवाई केली असून त्यांच्या ताब्यातून दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या आरोपींकडून चोरीचे आजुन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी या चोरट्यांनी राजूर येथील कापड दुकानात चोरी करत जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला होत.

Baner: बाणेरमधील हुक्का पार्लरवर छापा, मालकासह पाच जणांवर गुन्हा

बाणेर परिसरात कॅफेमधील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये मालकांसह व्यवस्थापक आणि कामगारांचा समावेश आहे.

औंध- बाणेर लिंक रस्त्यावर शेतामध्ये एका कॅफेत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी छापा टाकून कॅफे मालक अमित वाळके (रा. औंध), व्यवस्थापक बलभीम कोळी (रा. औंध), कॅफेचालक विक्रम द्वारकादास गुप्ता (वय २३, रा. बाणेर), कामगार सूरज संजय वर्मा (वय २४) आणि राजकुमार चन्नू अहिरवाल (वय १९) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

या कारवाईत हुक्का पार्लरचे साहित्य, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अधिक तपास पोलीस करत आहेत

Pune News: पुण्यात १४ नगरपरिषद आणि 3 नगर पंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात

१४ नगरपरिषद आणि 3 नगर पंचायतसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात

जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा,३ नगर पंचायतींच्या एकूण ३९८ सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.

यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे

Pune: पुणे महापालिकेची आज आरक्षण सोडत

इच्छुक उमेदवाराकडे सोडतीकडे लक्ष धाकधूक वाढली

गणेश कला क्रीडामंच येथे सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत सुरु होणार

41 प्रभाग आणि 165 सदस्यपदासाठी आरक्षण सोडत होणार

Amravati: पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते विपश्यना केंद्राचा पायाभरणी समारंभ

अमरावती शहरालगत असलेल्या कोंडेश्वर रोडवर दहा एकर परिसरात सृजनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळाच्या वतीने विपश्यना केंद्र व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचे निर्माण केल जाणार आहे या विपश्यना केंद्र व अभ्यासिकेचा पायाभरणी समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी,21 व्या शतकातील मजबूत पीढी इथून निर्माण होणार आहे, या देशाला संस्कार क्षम पिढी निर्माण होण्याची गरज आहे व ही पिढी निर्माण होण्यासाठी अशा विपश्यना केंद्राची गरज आहे.या विपश्यना केंद्रासाठी आपण शासनाचा सर्वोत्परी नीधी उपलब्ध करून देऊ अशी घोषणा देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला

गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांत थंडीच्या तीव्रतेत लक्षणीय वाढ झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार तापमानाचा पारा घसरला असून, अनेक ठिकाणी शीतलहर जाणवत आहे. या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक जागोजागी शेकोट्या पेटवून ऊब घेताना दिसत आहेत.

विशेषतः ग्रामीण भागात आजही थंडीच्या दिवसात शेकोटीचा आधार घेतले जाते. वृद्ध आणि लहान मुले थंडीचा सर्वाधिक त्रास सहन करत असल्याने, त्यांच्यासाठी शेकोटी हा एक मोठा आधार ठरत आहे.

Pune Weather: पुण्यात थंडीची लाट; तामपान कमी झाले

पुण्यात तापमान कमी झाल्याने गारठा वाढला आहे

गेले दोन-तीन दिवसापासून तापमान कमी झाल्याने पुण्याची थंडीची लाट आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्रावर स्वारी केल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे.पुण्यात आजचे तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे होते.थंडी सुरू झाल्याने अनेकजण थंडीपासून बचाव करता स्वेटर कानटोपी घालून बाहेर पडत आहे.अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालक सकाळी थंडीचा आनंद घेतना दिसत आहे.

Sanjay Rathod: मंत्री संजय राठोड यांना मातृशोक

राज्याचे जलसंधारण व मृद मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिलाबाई दुलीचंद राठोड वय 88 वर्षे यांचे यवतमाळच्या कळंब तालुक्यातील मूळगावी पहूर येथे निधन झाले. त्यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडली होती उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या मागे पती दुलीचंद राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय राठोड, मंत्री संजय राठोड ही दोन मुले मुलगी उषा गणेश जाधव यांच्यासह नातवंड व मोठा आप्त परिवार आहे.

Nagpur Municipal Corporation: नागपूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

- नागपूर मनपा निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या 151 असून 38 प्रभाग आहेत

- 37 प्रभात चार सदस्यीय तर 38 क्रमांकाचा प्रभाग तीन सदस्यीय आहे

- 151 नगरसेवकांच्या जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत

- त्यामुळे 76 नगरसेविका आणि 75 नगरसेवक असणार आहेत

- एससी 30, एसटी 10 तसेच ओबीसींसाठी 40 जागा राखीव आहेत

- एससी महिला, एसटी महिला, ओबीसी महिला, ओबीसी प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या पदांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत काढण्यात येणार आहे

Yavatmal Politics: यवतमाळ पालिकेसाठी शिंदेसेना-अजित पवार गटाचा फॉर्म्युला ठरला

यवतमाळ नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती निश्चित झाली असून सेना 32 तर राष्ट्रवादी 26 जागांवर निवडणूक लढणार आहे. भाजपने अद्याप होकार दिला नसला तरी नाकारही दिलेला नाही,यामुळे अजूनही महायुती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेवर आपली सत्ता असावी यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढतीचे चित्र सुरुवातीला होते मात्र जागा वाटपावरून महायुतीत उडतान सुरू आहे यामुळे यवतमाळ पालिकेसाठी शिवसेना शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची युती जवळपास निश्चित मानली जात आहे.

ओंकारच्या रूपाने वैद्यनाथचा पुनर्जन्मच ; कारखाना देताना प्रचंड वेदना ; मंत्री पंकजा मुंडे

ओंकार (वैद्यनाथ) कारखाना हे माझं चौथं अपत्य आहे असं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी म्हणत असंत. हा कारखाना देताना माझ्या मनात प्रचंड वेदना झाल्या हे सांगताना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना गहिवरून आले. ओंकार कारखाना यंदा दहा लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास आणावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.ओंकार (वैद्यनाथ) साखर कारखाना युनिट क्रमांक 08 चा द्वितीय बाॅयलर अग्निप्रदिपन व गळीत हंगामाचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठया थाटात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. ओंकारचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, माजी आमदार केशवराव आंधळे, वैद्यनाथचे उपाध्यक्ष चंद्रकांत कराड, संचालक अजय मुंडे, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष विनोद सामत, रमेश कराड, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, सतीश मुंडे, राजेश गिते, माऊली मुंडे, सुरेश माने, योगेश्वरी शुगरचे चेअरमन रोहित देशमुख, वसंत राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

साताऱ्याचं नगराध्यक्ष कोणाला मिळणार

सातारा नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या आज उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या आघाडीच्या वतीने दिवसभर मुलाखती पार पडल्या यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांनी एकत्र मुलाखती दिल्या यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी आमच्या दोघांचे मनोमिलन कायम असल्याचे सांगत कमळ चिन्हावर ही नगरपालिका निवडणूक लढवली जाणार असल्याचं यावेळी सांगितलं मात्र नगराध्यक्ष पदासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांची बैठक पार पडली यामध्ये नगराध्यक्ष कोणत्या आघाडीचा असावा याबाबत अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.यावेळी खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतःच इच्छुक असल्याचे मजेशीर टिप्पणी करत या प्रश्नाला बगल दिली.

Maharashtra Live News Update : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू

समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवर मेहकर जवळील चेनेल 298 वर भीषण अपघात. मुंबईहून नागपूरकडे जाणारी भरधाव स्कॉर्पिओने समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातात स्कॉर्पिओमधील एक जण ठार तर चालक गंभीर जखमी झालाय. जखमीवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com