Jharkhand building collapse Update :  Saam tv
देश विदेश

Jharkhand building collapse : सूरतनंतर आणखी एका ठिकाणी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता, मदतकार्य सुरु

Vishal Gangurde

झारखंड : गुजरातच्या सूरतमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असताना झारखंडमध्ये बहुमजली इमारती कोसळली आहे. झारखंडच्या देवघरमध्ये बहुमजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ६ ते ७ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. या पथकाने मदतकार्यही सुरु केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, झारखंडमधील देवघरचे आयुक्त विशाल सागर यांनी सांगितलं की, देवघरच्या सीता हॉटेलजवळील एक इमारत कोसळल्याची घटना घडली. इमारत कोसळ्याची घटना घडताच एनडीआरएफ आणि आरोग्य विभागाचं पथक घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस विभागाकडून मदतकार्य सुरु आहे. घटनास्थळी रुग्णावाहिका देखील आणण्यात आल्या आहेत.

देवघरच्या आयुक्ताच्या माहितीनुसार, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ६ ते ७ लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक लोकांनी दोन लहान मुलांना सुरक्षितपणे रेस्क्यू केलं आहे. सध्या घटनास्थळी खासदार निशिकांत दुबे आणि देवघर पोलीस अधिक्षक उपस्थित आहेत.

खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, 'झारखंडच्या देवघरमध्ये आज रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बमबम झा मार्गावर तीन मजली इमारत कोसळली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने एनडीआरएफचं पथक पाठवलं आहे. सकाळापासून भाजपचे वरिष्ठ नेते, स्थानिक लोकांसोबत घटनास्थळी उपस्थित आहे. स्थानिक लोकांनी आतापर्यंत ३ लोकांना सुरक्षितपणे रेस्क्यू केलं आहे. तर एनडीआरएफने १ महिलेला रेस्कू केलं आहे. मदतकार्य सुरु आहे. या घटनेतील जखमींना देवघरमधील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT