Congo Boat Accident Saam Tv
देश विदेश

Boat Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बोट नदीत बुडाली;८० जणांचा मृत्यू, शोधकार्य सुरु

Boat Accident In Congo: काँग्रो देशात बोट उलटून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास ८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Siddhi Hande

आफ्रिका खंडात एक भीषण दुर्घटना घडली आहे. आफ्रिका खंडातील काँगो देशातील नदीत बोट बुडाली आहे. या दुर्घटनेत तब्बल ८० हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे. या घटनेने काँगो देशात खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसल्याने ही दुर्घटना घडली आहे. सामान्यतः बोटीच्या क्षमतेनुसार प्रवासी बसवणे गरजेचे असते. परंतु या बोटीत जास्त प्रवासी बसले होते. त्यामुळे प्रवाशांचे वजन जास्त झाल्याने ही दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेसंदर्भात काँगो देशाचे राष्ट्राध्यक्ष फेलिक्स शिसेकेडी यांनी बुधवारी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोमवारी रात्री माई नडोम्बे प्रातांत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट जवळपास २७१ प्रवाशांना घेऊन किन्शासाला घेऊन जात होती. तेव्हा इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोट पाण्यात बुडाली. या घटनेत ८० हून अधिक लोांचा मृत्यू झाला आहे.

ही बोट क्वा नदीतून जात होती. तेव्हा जास्त प्रवासी या बोटमध्ये बसले होते. या घटनेत काहीजणांचे मृतदेह अद्याप हाती लागले नाहीत. या नदीत शोधकार्य सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card Fraud: बोगस रेशन कार्ड वाटप, १०० लोकांकडून प्रत्येकी ३००० उकळले, अकोल्यातील घटनेने राज्यात खळबळ

Maharashtra Live News Update: जालन्यातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

Movie Price : आता फक्त 200 रुपयांत पाहा चित्रपट, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT