Saamana Editorial: बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला, बाबागिरीचा मुखवटा जनतेनेच ओरबाडला; सामनातून ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

Thackeray Group Criticized On Narendra Modi BJP Politics: लोकसभेच्या निकालात अयोध्येमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. त्यावरून सामनामधून ठाकरे गटाने नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर टीका केली
Thackeray Group Criticized On Narendra ModiSaam Tv

लोकसभा निवडणुकांच्या निकालात नरेंद्र मोदी आणि भाजपचा पचका झालाय. जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचलंय. ही खेचाखेची करत जनतेने सभ्यता आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं. त्याचा गैरफायदा मोदी घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाचं मुखपत्र सामनामधून केला आहे. भाजपला सरकार बनवण्याइतके बहुमत देखील मिळालेले नाही. लोकसभा निकालांनी मोदींना जमिनीवर आणल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.

मोदींनी मान्य केलंय की, त्यांचा जन्मही इतर मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झालाय. मोदींना असे बोलण्याशिवाय पर्याय नसल्याचं सामनात म्हटलं आहे. कारण मोदींच्या देवत्वाचा, अवतारगिरीचा आणि बाबागिरीचा मुखवटा काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढल्याचा टोला सामनामधून (Saamana Editorial) ठाकरे गटाने लगावला आहे.

मोदींनी (Narendra Modi) स्वतःचा पराभव मान्य केला आहे. कालच्या निकालांनी मोदी गॅरंटीला केराची टोपली दाखवल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. मोदींना आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या आधारेच सरकार चालवावे (Thackeray Group Criticized On Narendra Modi) लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील याची गॅरंटी नसल्याची टीका देखील ठाकरे गटाने केली आहे. मोदींनी महाराष्ट्रात अठरा सभा आणि अनेक रोड शो केले होते. त्या अठरापैकी चौदा जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.

ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर टीका केली
Lok Sabha Election Result : निकालानंतर महायुतीत वादाचे फटाके; अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून पराभवाचं खापर भाजपवर?

मोदी आणि भाजप शब्दाला जागणारा पक्ष नाही.चंद्राबाबूंना हे माहितच आहे. बाबू यांनी देखील राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यताआणि लोकशाहीला इजा पोहोचेल, असे कृत्य करणार नसल्याचा विश्वास सामनामधून व्यक्त करण्यात आलाय. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा वापर (BJP Politics) करतील. परंतु ही तिसरी शपथ मोदी आणि भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर टीका केली
Lok Sabha Result 2024: भाजपच्या पराभवाची 10 कारणं, महाराष्ट्रात BJP ला का बसला फटका?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com