Afghanistan Earthquake Update Saam Tv
देश विदेश

Afghanistan Earthquake: जमिनीला भेगा, घरं कोसळली; मदतीसाठी आरडाओरडा, मृतदेहांचा खच; अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे ६२२ बळी

Afghanistan Earthquake Update: मध्यरात्री अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्याने हादरले. अफगाणिस्तानमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसले. यामध्ये ६२२ जणांचा मृत्यू तर १००० जण जखमी झाले.

Priya More

Summary -

  • अफगाणिस्तानच्या हिंदुकुश प्रदेशात ६.० रिश्टर स्केलचा भूकंप.

  • आतापर्यंत ६२२ जणांचा मृत्यू, १००० हून अधिक जखमी.

  • अनेक घरं कोसळली, दुर्गम भागात मोठे नुकसान.

  • तालिबान प्रशासनाने आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले.

अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्याने हादरले. अफगाणिस्तानच्या पूर्वीकडील प्रांतात रविवारी रात्री जोरदार भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अफगाणिस्तानमध्ये मोठे नुकसान झाले असून यामध्ये आतापर्यंत ६२२ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे १००० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुनार प्रांतातील हिंदूकुश प्रदेशात होता. ज्यामुळे नुरगल, सुकी, वाटपूर, मानोगी आणि चापे-दारे सारख्या दुर्गम भागांना मोठा फटका बसला आहे. या भूकंपामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये ६२२ जणांचा मृत्यू तर १००० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या वाढू शकते असे सांगितले. दुर्गम भाग असल्यामुळे मदत आणि बचाव कार्य अद्याप अनेक गावांपर्यंत पोहोचलेले नाही.

या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त ८ किलोमीटर खोलीवर होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. या भूकंपानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढिगाऱ्यात गाडलेल्या घरांचे आणि जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचे फोटो व्हायरल होत आहेत. या भूकंपामुळे अफगाणिस्तानमधील अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, भूकंपानंतर अनेक झोपड्या आणि काँक्रीटच्या घरांना भेगा पडल्या. तर काही घरं पूर्णपणे कोसळली. तालिबान प्रशासनप्रवक्त्यांनी सांगितले की, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. परंतु डोंगराळ प्रदेशात भूस्खलन आणि तुटलेल्या रस्त्यांमुळे बचाव पथकांना त्याठिकाणी पोहचण्यास अडथळे येत आहेत. रस्त्याने अनेक बाधित भागात पोहोचणे अशक्य झाल्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT