Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO

Russia Earthquake Hospital Video: रशियामध्ये आलेल्या भूकंपाचे धक्के हॉस्पिटलमध्ये देखील जाणवले. हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक भूकंप आला आणि सर्व वस्तू पुढे सरकू लागल्या. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.
Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO
Russia Earthquake VideoSaam Tv
Published On

Summary -

  • रशियामध्ये ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हॉस्पिटलला हादरे बसले

  • ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असताना भूकंप आला

  • डॉक्टरांनी धाडस दाखवत रुग्णाला वाचवले आणि शस्त्रक्रिया पूर्ण केली

  • सोशल मीडियावर थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल होत असून डॉक्टरांच्या कार्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे

८.८ रिश्टल स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे रशिया हादरले. या महाशक्तिशाली भूकंपाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भूकंपामुळे रशियामधील एका हॉस्पिटलची इमारत पूर्णपणे हालली. या हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये एका रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी भूकंपाचे धक्के बसले आणि ऑपरेशन थिएटरमधील सर्व वस्तू पुढे सरकू लागल्या. डॉक्टरांनी रुग्णाला पकडून तसंच ठेवलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रशियातील भूकंपाच्या वेळी एका रुग्णालयामध्ये डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करत होते. भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण हॉस्पिटल हादरले. ऑपरेशन थिएटरमध्ये असणारे टेबल, बेड सर्व काही पुढे सरकू लागले. ऑपरेशनसाठी लागणारे साहित्य खाली पडू लागले. डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवत सर्व वस्तू पकडून ठेवल्या. काही डॉक्टरांनी बेडवर असलेल्या रुग्णाला पकडून ठेवले. हे दृश्य खूपच भयानक आहेत.

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO
Russia-Ukraine War: रशिया- युक्रेनमधील युद्ध संपेना! पुन्हा ड्रोन हल्ला, शॉपिंग मॉल जमीनदोस्त

एवढा भयंकर भूकंप असताना डॉक्टरांनी रुग्णाला तिथेच सोडून पळ काढला नाही तर त्या रुग्णाला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी पकडून ठेवलं. त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया पू्र्ण केली. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमधील हा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सर्व डॉक्टर्सचे कौतुक केले आहे.

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO
Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

रशियामध्ये आलेल्या भूकंपामुळे अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी पहाटे रशियाच्या सुदूर पूर्वेला झालेल्या भूकंपामुळे उत्तर पॅसिफिकमध्ये त्सुनामी आली. अमेरिकेतील अलास्का आणि हवाई तसंच न्यूझीलंडच्या दक्षिणेला त्सुनामीचा इशारा देण्यात आला. मंगळवारी हवाईची राजधानी होनोलुलुमध्ये त्सुनामी इशारा देणारे सायरन वाजले आणि लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. जपान हवामानशास्त्र संस्थेने सांगितले की, सुमारे ३० सेंटीमीटर उंचीची पहिली त्सुनामी लाट होक्काइडोच्या पूर्व किनाऱ्यावरील नेमुरोपर्यंत पोहोचली.

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO
Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com