Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO

Russia Earthquake Video: रशियामध्ये ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपानंतर रशिया आणि जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियात आलेल्या भूकंपाचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ समोर आले आहेत....
Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO
Russia Earthquake VideoSaam Tv
Published On

भूकंपाच्या धक्क्याने रशिया देश चांगलाच हादरला आहे. रशियामध्ये बुधवारी सकाळी ८.८ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. रशियामध्ये आलेल्या या शक्तिशाली भूकंपानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यामुळे अचानक बिल्डिंग हालू लागल्या, घरातील सर्व वस्तू खाली पडल्या, किंचाळत लोकं घराबाहेर पडले. रशियातील या शक्तिशाली भूकंपाच्या हादऱ्यानंतर सोशल मीडियावर अनेक थरकाप उडवून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत.

भूकंपामुळे रशिया, जपान, गुआम, हवाई आणि अलास्कासह संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रात त्सुनामीचा इशारा देण्यात आला. नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत. रशियामध्ये आलेल्या ८.८ रिश्टर स्केल भूकंपामुळे इमारती गदागदा हालू लागल्या, घरातील सर्व वस्तू जोर जोरात खाली पडू लागल्या, दरवाजे आपटू लागले, खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घरांमध्ये असणाऱ्या महिला किंचाळताना आणि ओरडताना दिसत आहे. जीव वाचवण्यासाठी ते इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. अशाच प्रकारचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तर दुसरीकडे आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला मोबाईलच्या दुकानामध्ये खुर्चीवर बसून काम करत होती. भूकंपाचा हादरा बसल्यानंतर त्या दुकानामधील सर्व सामान आणि कपाट खाली पडले. या महिलेच्या अंगावर सर्व वस्तू पडल्या. त्यानंतर ही महिला दुकानातील टेबलखाली लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. दुकानामध्ये लावललेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली. ही महिला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडताना दिसत आहे.

भूकंपाचे धक्के बसल्यानंतर सायरन वाजवण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. तर काहींनी उंच डोंगरावर जाऊन आपला जीव वाचवला. भूकंपाच्या धक्क्यानंतर इतर काही भागात बचाव कार्य केले जात आहे. जपान आणि रशियामध्ये या भूकंपाबाबत खबरदारीचे उपायही जारी करण्यात आले आहेत. दोन्ही देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रामध्ये ११ फूटांपर्यंत उंचच उंच लाटा येत आहेत. खवळलेल्या समुद्राचे व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत.

कामचटकाचे राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी म्हटले की, 'आजचा भूकंप खूप गंभीर आहे. गेल्या दशकातील हा सर्वात धोकादायक भूकंप आहे. ते म्हणाले की, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नसले तरी, नुकसान झाले आहे. ' सोशल मीडियावर भूकंपाच्या धक्क्याचे अनेक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO
Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com