
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाणारे २ संघ ठरले आहेत. तर उर्वरीत २ संघ कोणते? हे आज ठरणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
हा सामना जिंकून दोन्ही संघांकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. अफगाणिस्तानला पहिल्यांदाच सेमीफायनल गाठण्याची संधी असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघही संधी हातून जाऊ देणार नाही. मात्र या सामन्यातही पावसाने खोडा घातला, तर सेमीफायनलमध्ये कोण जाणार? जाणून घ्या.
ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत २ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला होता. तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार होता. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यासह ऑस्ट्रेलियाचे गुण ३ आहेत. तर नेट रनरेट +०.४७५ इतका आहे. तर अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला.
अफगाणिस्तानचे २ गुण आहेत. मात्र या संघाकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी चालून आली आहे. ग्रुप बी मध्ये इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला जर सेमीफायनलमध्ये जायचं असेल, तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकणं गरजेचं असणार आहे.
मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. असं झाल्यास ३ गुणांसह अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर ४ गुणांसह ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने शेवटचा संघ गमावला, तरीदेखील हा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. कारण दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा अफगाणिस्तानपेक्षा चांगला आहे. यापूर्वी २ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे या सामन्यावरही पावसाचे सावट असण्याचे संकट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.