AAP supporters celebrate massive victory in Punjab civic elections as party crosses 500-seat mark. saam tv
देश विदेश

भाजपचा सुपडासाफ, 'आप'ची गाडी सुसाट; 500 जागांवर विजय, काँग्रेसला किती जागा मिळाल्या?

Punjab Civic Results: पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला असून 500 हून अधिक जागांवर बाजी मारली आहे.

Omkar Sonawane

पंजाबमध्ये स्थानिक नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या निकालांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाने लक्षणीय आघाडी घेतली आहे, तर काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. भाजपचा दारुण पराभव झाला असून अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या निकालासंदर्भात राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत.

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि 'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांनी पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात ट्विट करत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यांनी लिहिले, आम आदमी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा जनतेचा मेसेज आहे की, ते भगवंत मान सरकारने केलेल्या कामकाजावर खुश आहे. तसेच जनतेने हा देखील मेसेज दिला आहे की, ED पार्टीच्या तुष्टीकरणाचे राजकारण पंजाबच्या सरकारला मान्य नाहीये.

दुपारी 2 वाजेपर्यंत आम आदमी पक्षाचे तब्बल 583 नगरसेवकांनी बाजी मारली आहे. तर काँग्रेसने 204 आणि शिरोमणी अकाली दलाने 136 वॉर्डमध्ये आपला झेंडा रोवला आहे. तर बीजेपीने फक्त 52 जागांवर मिळवला आहे. 2027 ला होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक एक कसोटी मानली जात होती. 8 महानगरपालिका, 75 नगरपालिका आणि 19 नगरपंचायतीसह 102 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधि निवडण्यासाठी 26 मे रोजी मतदान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT