राज्यभरात खळबळ माजवून देणाऱ्या भोंदू अशोक खरातचा प्रवर्तन निदेशालयाने (ED) ने ताबा घेतला असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेण्यात येत आहे. अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी नाशिकमध्ये आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याचा ताबा घेतला. ताबा घेतल्यानंतर ईडीचे पथक खरातला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान आजच मुंबईत ईडीकडून अशोक खरातला पीएमएलए (PMLA) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आर्थिक गैरव्यवहार, बनावट बँक खाती आणि मनी लाँड्रींगसारख्या गंभीर आरोपाप्रकरणी ईडीने खरातविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ईडीकडून सखोल चौकशी करण्यात येणार असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.