corona update  Saam Tv
देश विदेश

Corona News: देशात मागील २४ तासांत नवीन ५१४ कोरोना रूग्णांची नोंद, ३ मृत्यू

India Corona Update: देशात मागील २४ तासातील कोरोनाची नवीन रूग्णसंख्या समोर आलीय. मागील २४ तासांत कोरोनाचे ५१४ नवीन रूग्ण आढळले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Corona Patients in India

आता कोरोना (Corona) सक्रीय रूग्णांची संख्या आता ३ हजार ४२२ झाली आहे. सक्रिय रूग्णांपैकी सुमारे ९२ टक्के रुग्ण होम क्वारंटाईनमधून बरे होत आहेत. अधिकृत स्त्रोतांनी सांगितलं आहे की, JN.1 उप-प्रकारामुळं नवीन रूग्णांमध्ये वाढ होत नाही. तसंच हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूंमध्येही वाढ होत नाही. (latest corona update)

आरोग्य मंत्रालयानं आज सांगितलं की, भारतात कोरोनाचे ५१४ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. संसर्गाच्या सक्रिय रूग्णांची (Corona) संख्या आता ३ हजार ४२२ आहे. आज सकाळी ८ वाजता याबाबत (India) आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे. २४ तासांच्या कालावधीत तीन मृत्यूची नोंद झालीय. दोन महाराष्ट्रात आणि एक कर्नाटकात मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ डिसेंबर २०२३ पर्यंत कोरोनाच्या दैनंदिन प्रकरणांची संख्या (Corona) कमी झाली होती. परंतु कोविडचा नवीन उप-प्रकार जे.एन १ आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर रूग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. बुधवारी ६०४ नवीन रूग्ण नोंदवले गेले होते. दिवसभरात चार रूग्णांचा 4 मृत्यू झाला होता. केरळ आणि कर्नाटकमधून सर्वाधिक रूग्ण समोर येत आहेत.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ डिसेंबरनंतर ३१ डिसेंबर २०२३ रोजी एका दिवसात जास्तीत जास्त ८४१ रूग्णांची नोंद झाली आहे. एकूण सक्रिय प्रकरणांपैकी सुमारे ९२ टक्के होम क्वारंटाईनमधून (Corona) बरे होत आहेत.

कोरोनाच्या तीन लाटा

गेल्या चार वर्षांत भारत (India) कोरोनाच्या तीन लाटांना सामोरे गेला आहे. ज्यामध्ये एप्रिल-जून २०२१ दरम्यान कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेव्ह दरम्यान दररोज नवीन रूग्ण आणि मृत्यूची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली. ७ मे २०२१ रोजी जेव्हा डेल्टा लाट सर्वात जास्त होती, तेव्हा एकाच दिवसात सर्वाधिक ४,१४,१८८ नवीन रूग्णसंख्या आणि ३,९१५ मृत्यूची नोंद झाली. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून (Corona) बरे झालेल्या लोकांची संख्या ४.४ कोटींहून अधिक आहे, राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर ९८.८१ टक्के आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसींचे २२०.६७ कोटी डोस देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT