Cough Symptoms : सामान्य वाटत असणारा खोकला Covid किंवा TB तर नाही ना? ही लक्षणे दिसतात त्वरीत घ्या डॉक्टरांचा सल्ला

Cough Causes : सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. अशातच जर तुम्हाला सतत खोकला येत असेल तर हे गंभीर असू शकते.
Cough Symptoms
Cough Symptoms Saam Tv
Published On

How To Know If Your Cough Covid Or TB :

हिवाळा सुरु झाला की, अनेक संसर्गजन्य आजार होतात. या काळात आरोग्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. अशातच जर तुम्हाला सतत खोकला येत असेल तर हे गंभीर असू शकते.

सध्या कफ (Cough) ही समस्या अंत्यत सामान्य बनली आहे. पण सामान्य वाटत असणारी ही समस्या अधिक गंभीर स्वरुपाची असू शकते. कोरोना (Covid) विषाणू, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल यामुळे आपल्याला वारंवार खोकला येऊ शकतो.

पण कितीही औषधे केल्यानंतर खोकला थांबत नसेल तर तुम्हाला चाचणी करणे आवश्यक आहे. हा खोकला कोविड, फ्लू (Flu), सर्दी किंवा टीबीमुळे असू शकतो. नेमका तुम्हाला झालेला खोकला कोणत्या प्रकारचा आहे हे जाणून घेऊया.

1. कोरडा खोकला

कोरडा खोकल्याची लक्षणे ही कोविड संबंधित असू शकतात. यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच कफ अधिक प्रमाणात साठून राहातो. घसा आणि छातीत सतत अस्वस्थता निर्माण होते. यामध्ये अनेकांना हलका ताप देखील येतो. सतत थकवा जाणवणे, चव किंवा वास न येणे. ही लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

Cough Symptoms
Bad Foods For Bones : या चुकीच्या पदार्थांमुळे होते हाडांचे नुकसान, आतून होतात पोकळ; तुम्ही देखील करताय का आहारात याचा समावेश?

2. फ्लू खोकला

फ्लूमुळे कोरडा खोकला होऊ शकतो. यामध्ये छातीत कफ साठून राहातो. तसेच खोकल्यासोबत ताप, अंगदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात. ताप हे फ्लूचे सामान्य लक्षण आहे. थंडी वाजणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या असतात.

3. टीबी खोकला

क्षयरोगातील खोकला हा तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहातो. खोकलताना थुंकीमधून रक्त निघते. यामध्ये वजन कमी होणे, थकवा जाणवणे, रात्री भरपूर घाम येणे किंवा अधूनमधून ताप येऊ शकतो.

Cough Symptoms
Women Health Tips : नव मातांच्या स्तनात आढळणारा 'रस्टी पाईप सिंड्रोम' नेमका काय? याची लक्षणे कोणती? बाळावर कसा होतो परिणाम

4. काळजी कशी घ्याल?

  • खोकल्याचे कारण कोणतेही असेल तरी सतत खोकला येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • हाताची वारंवार स्वच्छत: राखा, साबण किंवा पाण्याने हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.

  • खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक टिश्यूने किंवा रुमालाने झाकून ठेवा.

  • आजारी व्यक्तींपासून शारीरिक अंतर राखा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com